या मंदिराचा चमत्कार स्टीव्ह जॉब्स आणि मार्क झुकेरबर्ग यांनीही केला आहे मान्य

temple
नीम करौली मातेचे मोठे प्रसिध्द मंदिर तसेच नीम करौली बाबाचा नैनीताल जवळ कैंचीमध्ये आश्रम आहे. अनेक लोकांच्या आस्थेचे हे मंदिर केंद्र आहे. पण हे ठिकाण २००७ मध्ये जास्त चर्चेत आले, फेसबुकचे संस्थापक मार्क झुकेरबर्गने जेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतल्यानंतर या जागेचा उल्लेख केला.

नरेंद्र मोदींना झुकेरबर्गने सांगितले की, फेसबुकचे जेव्हा वाईट दिवस सुरु होते तेव्हा भारतात ते कसे आले आणि या मंदिरातून प्रेरणा रुपी शक्ती घेऊन आज यश मिळवले. झुकेरबर्गने यासोबतच सांगितले की, ते येथे अॅपलचे संस्थापक स्टीव जॉब्सच्या सांगण्यावरुन आले होते.
temple1
१९७३मध्ये संन्यास घेण्याच्या उद्देशाने स्टीव्ह जॉब्स या मंदिरातील बाबांकडे आले होते. त्यांचे मित्र डौन कोटके त्यांच्यासोबत होते. नीम करौली बाबांना भेटायला ते येथे आले होते. पण ते येण्याच्या काळी काळाअगोदर बाबांचा मृत्यू झाला होता. स्टीव जॉब्सने येथे काही दिवस राहून ध्यान-आराधना केली. त्यांना येथूनच आपल्या देशात जाऊन कंपनी स्थापन करावी अशी प्रेरणा मिळाली. जॉब्सने येथून गेल्यानंतर अॅपल कंपनी बनवली. आज ही कंपनी टेक्नोलॉजीसाठी जगातील दर्जेदार कंपनी मानली जाते. स्टीव जॉब्स आयुष्यभर नीम करौली बाबाचे भक्त राहीले.
temple2
मार्क झुकेरबर्गच्या फेसबुक कंपनीवर २००४मध्ये मोठे संकट आले होते. तेव्हा त्यांच्यावर कंपनी विकण्याची वेळ आली होती. झुकेरबर्गने त्यावेळी आपले गुरु स्टीव जॉब्स यांच्याकडे सल्ला मागितला. त्यांनी तेव्हा सांगितले की, भारतात काही दिवस जाऊन या मंदिरात वेळ घालव, त्यांना हे ऐकून आश्चर्य वाटले. मंदिरात झुकेरबर्ग आले आणि येथूनच त्यांना अशी शक्ती मिळाली ज्यामुळे त्यांनी आज यश मिळवले.

Leave a Comment