केरळमधील पुरग्रस्तांच्या मदतीसाठी गुगलची ७ कोटींची मदत

google
नवी दिल्ली – केरळमधील पुरग्रस्तांच्या मदतीसाठी गुगल कंपनीने ७ कोटींची मदत जाहीर केली आहे. गुगलचे (दक्षिण आशिया आणि भारत) उपाध्यक्ष राजन आनंदन यांनी याबाबतची घोषणा केली.

इंडिया एव्हेंट या गुगलच्या कार्यक्रमात केरळच्या मदतीसाठीची घोषणा करण्यात आली. केरळमधील पूरग्रस्तांना गुगल क्रायसीस रिस्पॉन्स टीमने विविध प्रकारे मदत केली आहे. पर्सनर फाईंडर असा पर्याय यामध्ये देण्यात आला आहे. त्यातून हरविलेल्या व्यक्तींचा ठावठिकाणा शोधण्यास मदत होते. २९ मेपासून आलेल्या पावसामुळे केरळमध्ये भयंकर पूर आला होता. यामध्ये ८.६९ लाख नागरिकांना स्थलांतर करावे लागले. हे नागरिक सुमारे २ हजार ७८७ मदतकेंद्रात राहत आहेत.

Leave a Comment