गुगल असिस्टंटची सेवा आता इंग्रजीबरोबरच मराठीतही

google1
गुगल असिस्टंटला सूचना देण्यासाठी आता तुम्ही मराठीतही बोलू शकता. नुकतेच दिल्लीमध्ये Google for India 2018 (गुगल फॉर इंडिया) चे चौथे एडिशन आयोजित करण्यात आले होते. गुगलने या कार्यक्रमात भविष्यातील योजनांबाबत अनेक घोषणा केल्या. गुगलचे सिनीयर इंजिनिअरिंग डायरेक्टर प्रवीर गुप्ता यांनी यावेळी गुगल असिस्टंटची सेवा आता मराठी भाषेतही सुरू होत असल्याची घोषणा केली.

आता हिंदी आणि इंग्रजीबरोबरच प्रादेशिक भाषांमध्येही गुगल असिस्टंटची सेवा सुरू होणार आहे. सध्या यामध्ये मराठी भाषेत सेवा उपलब्ध होणार असून इतर सात भारतीय भाषांमध्येही लवकरच ही सुविधा उपलब्ध करुन दिली जाईल, असे गुप्ता यांनी सांगितल्यामुळे गुगल असिस्टंटसोबत आता तुम्ही मायबोली मराठी भाषेत बोलुनही सूचना देऊ शकतात.

Leave a Comment