मुंबई आणि पुण्यात भाडेतत्वावर मिळत आहेत ब्रॉयफ्रेन्ड

RABF
मुंबई : तुम्हाला नैराश्यापासून मुक्ती मिळण्यासाठी ब्रॉयफ्रेन्ड भाडेतत्वावर मिळू शकतो, त्यासाठी एक वेबसाईट सुरू करण्यात आली असून सध्या ही सेवा मुंबई आणि पुण्यात मिळणार असल्याचे, या वेबसाईटवर दिसून येत आहे.

‘रेन्ट अ बॉयफ्रेन्ड’ ही वेबसाईट कौशल प्रकाश, या २९ वर्षाच्या तरूणाने सुरू केली असून तुम्हाला ही वेबसाईट गूगलवर आरबीएफ म्हणजेच ‘रेन्ट अ बॉयफ्रेन्ड’ टाकल्यावर दिसेल. ही वेबसाईट सुरक्षित असल्याचा दावा करण्यात येत आहे. यात बॉयफ्रेन्डला तुम्हाला खासगी ठिकाणी भेटता येणार नाही, असा नियम आहे. म्हणजेच सार्वजनिक ठिकाणी तुम्हाला भेटावे लागेल. यात रेस्टॉरंट, कॅफे, सिनेमागृह यासारख्या जागांचा समावेश असेल.

मॉडेल, सेलिब्रिटी आणि सर्वसामान्य बॉयफ्रेन्ड म्हणून तुम्हाला निवडता येतील. मॉडेलसाठी प्रतितास २ हजार रूपये, सेलिब्रिटीसाठी प्रतितास ३ हजार रूपये, तर सामान्य माणसासाठी प्रतितास ४०० ते ५०० रूपये आकारले जातील. बॉयफ्रेन्ड म्हणजे तुमच्या भावना समजून घेणारा मित्र, असे सांगून तुमची माहिती गोपनीय ठेवली जाणार असल्याचा दावा या वेबसाईटकडून केला जात आहे.

Leave a Comment