आता आले आहे डासांना पळविणारे मोबाईल अॅप !

app
सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने सर्वत्र पाणी साठून डासांचा उपद्रव वाढत आहे. डासांचा उपद्रव वाढला की डेंगी, मलेरिया हे रोगही फैलावू लागतात. अश्या वेळी घरामध्ये आणि घराबाहेर असताना डास चावणार नाहीत याची सर्वतोपरी काळजी घेणे आवश्यक ठरते. यासाठी बाजारामध्ये मॉस्किटो रिपेलंटस् उपलब्ध आहेत. ही रिपेलंटस् , क्रीम्स, कपड्यांवर लावण्यासाठी रोल ऑन्स, गोलाकार पॅचेस अश्या अनेक रूपांमध्ये उपलब्ध आहेत. या शिवाय घरामध्ये किंवा ऑफिसमध्ये वापरता येण्याजोग्या कॉइल्स, आणि व्हेपरायझर्सही आहेतच. पण आता या सर्व सामग्रीच्या बरोबरच डासांना पळविण्याचे काम आपला स्मार्ट फोन देखील करू शकणार आहे. आहे ना आश्चर्याची गोष्ट?
app1
डासांना पळविण्यासाठी आता कॉइल्स, किंवा इतर साहित्य उपलब्ध नसले तरी काळजी करण्याची आवश्यकता नाही. आता हे काम आपण आपल्या स्मार्ट फोन द्वारे देखील करू शकणार आहे. यासाठी आपल्याला आपल्या फोनवर एक अॅप डाऊनलोड करावे लागेल. या अॅपमधून हाय फ्रिक्वेन्सी ध्वनी लहरी निर्माण होतील, आणि या ध्वनी लहरींच्या मुळे डास नाहीसे होतील. ‘हर्टझिअर’ नामक हे अॅप आपल्या स्मार्ट फोनवर डाऊनलोड करण्यासाठी ग्राहकाला साठ रुपये मोजावे लागणार आहेत. हे अॅप इंस्टॉल केल्यानंतर डास पळविण्यासाठी याचा वापर केला असता, या अॅपमधून असे ध्वनी बाहेर येतात जे डासांना पळवून लावण्यास सक्षम आहेत.
app2
विशेष गोष्ट अशी, की या ध्वनी लहरींचा त्रास केवळ डासांना होत असून, हे अॅप वापरणाऱ्याला यापासून कोणत्याही प्रकारचा उपद्रव होत नाही. या ध्वनी लहरी आपल्याला ऐकू न येता केवळ डासांना जाणवितील अश्या प्रकारच्या आहेत. आतापर्यंत हे अॅप सुमारे दहा हजार लोकांनी आपल्या फोन्सवर डाऊनलोड करून घेतले असून, या अॅपचा साईझ 4.7 एमबी इतका आहे. जर हे अॅप तुम्हाला तुमच्या स्मार्फोनवर डाऊनलोड करायचे असेल तर त्या करिता तुमच्या फोनमध्ये २.३ हून पुढील व्हर्जनची अँड्रॉइड ऑपरेटिंग सिस्टम असणे आवश्यक आहे. हे अॅप केवळ डासांना नाही, तर कुत्री-मांजरी यांसारखे प्राणी लांब ठेवण्यासही सहायक आहे.

Leave a Comment