पाठांतर करण्यासाठी या तीन पायऱ्याठरतील विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त.

study
एखाद्या विषयाचा अभ्यास करताना पाठांतर करणे किती महत्वाचे असते, हे विद्यार्थी दशेमध्ये आपण सर्वांनीच अनुभविले आहे. मात्र काही व्यक्तींच्या बाबतीत विषयाचे पाठांतर ही मोठीच अडचण असते. हा प्रश्न सोडवून पाठांतर सोपे करण्यासाठी नोबेल पारितोषिक विजेते भौतिकशास्त्रज्ञ रिचर्ड फेनमन यांनी एक उत्कृष्ट पर्याय शोधून काढला आहे. त्यांनी शोधलेल्या फॉर्म्युलानुसार जर एखाद्या विषयाचा अभ्यास केला गेला, तर विषय समजण्यास सोपा होतोच, शिवाय केलेले पाठांतर किंवा वाचलेली माहिती दीर्घ काल लक्षात राहण्यासही मदत होते.

विषय कोणताही असो, त्याचे पाठांतर फेनमन टेक्निक प्रमाणे करणे सहज शक्य होते. या टेक्निकच्या मदतीने केवळ पाठांतर सोपे होत नाही, तर विषयाचे उत्तम आकलन होऊन विचार करण्याची पद्धतही बदलत जाते. हे टेक्निक अवलंबण्याच्या तीन पायऱ्या फेनमन यांनी सांगितल्या आहेत. सर्वप्रथम आपल्याला ज्या विषयाचा अभ्यास करायचा आहे, त्या विषयामधील नेमकी कोणती कन्सेप्ट आपल्याला समजून घ्यायची आहे, ती एका वहीमध्ये लिहून काढावी. ही कन्सेप्ट विद्यार्थ्याने स्वतःच्या शब्दांमध्ये लिहायची आहे. तसेच कन्सेप्ट लिहिताना एखाद्या लहान मुलाला आपण शिकवीत आहोत असे समजून, भारी-भरकम, पुस्तकी शब्दांचा वापर न करता, साध्या सोप्या शब्दांमध्ये ही कन्सेप्ट लिहून काढायची आहे.
study2
एकदा कन्सेप्ट लिहून झाली, की लिहिलेली माहिती परत एकदा वाचून पाहून त्यामध्ये सर्व मुद्दांचा समावेश केला गेल्याची खात्री करून घ्यावी. तसेच ही उपलब्ध माहिती इतर कन्सेप्ट्सची जोडण्याचा प्रयत्न करावा. जिथे अडचण उद्भवेल, तिथे रेफरन्स मटेरियलचा आधार घ्यावा. त्यानंतर लिहून काढलेली सर्व माहिती जुळवून घेऊन ती योग्य पद्धतीने ‘ऑर्गनाईझ’ करावी. हे करताना देखील भाषा साधी सोपी असावी. आता विद्यार्थ्याकडे त्याने स्वतः, त्याला समजतील अश्या भाषेमध्ये तयार केलेल्या नोट्स उपलब्ध असतील. ही माहिती आता मोठ्याने वाचून पहावी. ही माहिती साध्या सोप्या भाषेमध्ये विद्यार्थ्याने स्वतः तयार केली असल्यामुळे त्या कन्सेप्टचे आकलन आणि पाठांतर प्रभावीपणे करता येणे शक्य होईल.

एकदा कन्सेप्ट समजली, की ती मित्र-मैत्रिणींच्या पुढे मांडावी. कन्सेप्ट स्वतः समजावून सांगितली तर ती अधिक लक्षात राहण्यास मदत होते. अश्या रीतीने विषयाचे पाठांतर सोपे होते.

Leave a Comment