या शिव मंदिरात होते पूजा आणि नमाजही अदा केली जाते

temple
हिंदूंच्या आस्थेचे प्रमुख केंद्र म्हणून शिव मंदिर मानले जातात. पूर्ण श्रद्धा आणि विश्वासाने जगभरातील सर्व हिंदू महादेवाची पूजा करतात पण एखाद्या शिव मंदिरात मुस्लिमसुद्धा नमाज अदा करतात असे तुम्ही कधी ऐकले आहे का? नाही ना… मग आम्ही आज तुम्हाला भारतातील एका शिव मंदिराबाबत सांगणार आहोत जेथे शिवलिंगाचा जलाभिषेक होतो आणि त्याचबरोबर येथे मुस्लिम लोक नमाज देखील अदा करतात.
temple1
उत्तर प्रदेशातील गोरखपूर जिल्ह्यापासून काही अंतरावर तिवारी एक गाव असून महादेवाचे एक प्राचीन मंदिर या गावामध्ये आहे. झारखंडी महादेव असेही याला म्हणतात. हे मंदिर अत्यंत खास आणि अनोखे मानले जाते. या संदर्भातील कथा महमूद गजनवीशी संबंधित आहे. कथेनुसार, मेहमूद गजनवीने या शिवलिंगाचा महिमा आणि प्रसिद्धी ऐकून हे शिवलिंग तोडण्याचा खूप प्रयत्न केला. त्याला हे शिवलिंग तोडणे आपली पूर्ण शक्ती पणाला लावूनही शक्य न झाल्यामुळे शिवलिंगावर त्याने कुराणमधील एक कलमा लिहिला. यामुळे शिवलिंगाची प्रसिद्धी कमी होईल आणि हिंदू लोक पूजा करणार नाहीत असे त्याला वाटले. मेहमूदने कलमा लिहिल्यानंतर या शिवलिंगाची प्रसिद्धी आणखीनच वाढली आणि हिंदू लोकांसोबत येथे मुस्लीम लोकांचीही गर्दी वाढू लागली. हे दोन्ही धर्माच्या लोकांच्या श्रद्धेचे केंद्रस्थान बनले.
temple2
अनेकवेळा या शिव मंदिरावर छत तयार करण्याचा प्रयत्न करण्यात आला परंतु कोणीही हे काम यशस्वीपणे पूर्ण करू शकले नाही. यामुळे मंदिरात शिवलिंग आकाशाखाली स्थापित आहे. या शिव मंदिराशी संबंधित एका मान्यतेनुसार, या मंदिरातील शिवलिंग कोणत्याही मनुष्याने स्थापित केलेले नसून आपोआप प्रकट झाले आहे. स्वतः प्रकट झाल्यामुळे हे शिवलिंग खास आणि चमत्कारी मानले जाते.

Leave a Comment