फोटो-मेसेजिंग अॅप इन्स्टाग्राम विद्यार्थ्यांसाठी आणणार खास फिचर

instagram
सध्या एक नवे फिचर लोकप्रिय फोटो-मेसेजिंग अॅप इन्स्टाग्राम पडताळून पाहत असून विद्यार्थ्यांना या फिचरद्वारे त्यांच्या कॉलेज ग्रुपमधील सहकारी आणि बॅचमेट्स शोधण्यात मदत होणार आहे.

विद्यार्थ्यांना या फिचरमध्ये प्रोफाईल बनवल्यानंतर त्यांचे कॉलेज आणि कोणत्या वर्षी कॉलेजमध्ये प्रवेश घेतला होता हे सिलेक्ट करावे लागेल. यामुळे त्यांच्या कॉलेजमधील मिसिंग फ्रेंडला शोधणे किंवा त्याला थेट मेसेज करणे युजरला अगदी सोपे होणार आहे. या फिचरवर सध्या केवळ प्रायोगिक तत्वावर काम सुरू आहे. पण यशस्वीरित्या फिचरची चाचणी पूर्ण झाल्यानंतर लवकरच जगभरातील युजर्सना हे फिचर उपलब्ध करुन दिले जाणार आहे. इंस्टाग्रामचा या फिचरद्वारे अधिकाधीक तरुणांना आकर्षित करण्याचा प्रयत्न असणार आहे. इंस्टाग्रामने गेल्या काही दिवसांमध्ये अनेक फिचर्स जारी केले आहेत. यामध्ये इंस्टाग्राम टीव्ही(आयजीटीव्ही), व्हिडीओ चॅट, फिल्टर्स आदींचा समावेश आहे. सध्या १ अब्जाहून अधिक युजर्स इंस्टाग्रामचा दरमहिन्याला वापर करतात.

Leave a Comment