टीव्हीवर प्रदर्शित होणाऱ्या सुप्रसिद्ध मालिकांमधून आपल्याला भेटत रहाणारे लोकप्रिय कलाकारांनी आपल्या अभिनयगुणांच्या जोरावर यश मिळविले आहेच, त्याशिवाय वास्तविक आयुष्यामध्येही हे कलाकार उच्चशिक्षित असून, आपल्या बुद्धिमत्तेच्या जोरावर त्यांनी उत्तम शैक्षणिक पात्रताही मिळविली आहे.
अतिशय लोकप्रिय ठरलेली मालिका ‘एफआयआर’ मध्ये इन्स्पेक्टर चंद्रमुखी चौटालाची भूमिका अजरामर करणारी अभिनेत्री कविता कौशिक ही तिच्या बेजोड कॉमिक टायमिंग साठी ओळखली जाते. कविता हिने तत्वज्ञान विषयामध्ये पदवी प्राप्त केली आहे. कविताने आजवर अनेक मालिकांमध्ये भूमिका केल्या असून, कटुंब, कहानी घर घर की, कुमकुम या मालिकांमधील तिने साकारलेल्या भूमिका लोकप्रिय ठरल्या आहेत.
अभिनेता रवी दुबे हा लोकप्रिय टीव्ही कलाकारांपैकी एक आहे. भूमिका कोणतीही असो, ती लीलया पेलण्यामध्ये रवीचा हातखंडा आहे. रवीला नृत्यकला उत्तम अवगत असून, तो एक उत्तम टीव्ही शो होस्टही आहे. इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन विषयामध्ये रवीने इंजिनयरिंगची पदवी प्राप्त केली असून, त्याने जर्नालिझममधे डिप्लोमाही मिळविलेला आहे.
‘बडे अच्छे लागते है’ या लोकप्रिय मालिकेमध्ये यशस्वी उद्योगपतीची भूमिका साकाणारा अभिनेता राम कपूर छोट्या पडद्यावरील अतिशय लोकप्रिय अभिनेत्यांपैकी एक आहे. रामने लॉस अँजेलीस येथून अभिनय विषयामध्ये मास्टर्सची पदवी मिळविली आहे.
‘ये है मोहब्बते’ मालिकेमध्ये भूमिका करीत असणारा अभिनेता करण पटेल याने मुंबईच्या मिठीबाई कॉलेजमधून पदवी मिळविली असून, त्यानंतर त्याने लंडन स्कूल ऑफ आर्टसमधून पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले आहे.
‘कुछ तो लोग कहेंगे’ या मालिकेमध्ये भूमिका साकारणारा अभिनेता शरद केळकर अनेक हिंदी चित्रपटांमध्येही झळकला आहे. बाहुबली चित्रपटाच्या हिंदी आवृत्तीमध्ये बाहुबलीच्या भूमिकेला शरदनेच आवाज दिला आहे. शरदने ग्वाल्हेर येथील मॅनेजमेंट इंस्टीट्युट मधून मार्केटिंग विषयामध्ये एमबीएची पदवी मिळविली आहे.