अवश्य पाहू शकता ‘हॅप्पी भाग जाएगी फिर से’

happy
‘हॅप्पी भाग जाएगी’मध्ये आपण डायना पँटीची पळून जाण्याची कहाणी पाहिली आहे. तर आता प्रेक्षकांच्या भेटीला ‘हॅप्पी भाग जाएगी फिर से’ हा चित्रपट आला आहे. सोनाक्षीसाठी हा चित्रपट अनेक चित्रपटांनंतर जीवनदान म्हटला जाऊ शकतो. सोनाक्षी या चित्रपटातील पंजाबी टचमुळे एकदम बदललेली दिसत आहे. सुरुवातीपासून शेवटपर्यंत चित्रपटाचे कॉमिक टायमिंग बांधलेले राहते. हा चित्रपटही पहिल्या चित्रपटाप्रमाणेच कम्पलीट एन्टटेनर आहे.

२०१६मध्ये दिग्दर्शक मुदस्सर अजीजने ‘हॅप्पी भाग जाएगी’ चित्रपट बनवला होता. मुदस्सरने आता नवीन स्क्रिप्ट घेऊन ‘हॅप्पी फिर भाग जाएगी’ चित्रपट बनवला आहे. हॅप्पी यावेळी पाकिस्तानात नाही, तर चायनामध्ये पळाली आहे. दोन-दोन हॅप्पी चित्रपटात असल्यामुळे खुपच धावपळ होते. ही कथा चीनमध्ये सुरु होते. हॅप्पी (डायना पेंटी) आपला पती गुड्डू(अली फजल)सोबत चीनच्या शंघाई एयरपोर्टवर म्यूझिक कन्सर्टमध्ये आलेली आहे. तर दूसरी हॅप्पी(सोनाक्षी सिन्हा) शंघाईच्या एका यूनिव्हर्सिटीमध्ये प्रोफेसरचा जॉब जॉइन करण्यासाठी येते.

काही चीनी किडनॅपर एयरपोर्टवर पहिल्या हॅप्पीला (डायना पेंटी) किडनॅप करण्यासाठी येतात. परंतू एकच नाव असल्यामुळे ते चुकून दूसऱ्या हॅप्पीला (सोनाक्षी सिन्हा)किडनॅप करतात. यासोबतच किडनॅपर हे भारतातून दमन सिंह बग्गाला (जिम्मी शेरगिल) त्याच्या लग्नातून आणि पाकिस्तानातून उस्मान अफरीदीला (पीयूष मिश्रा) त्याच्या रिटायरमेंट पार्टीमधून उचलतात.

किडनॅपरच्या जाळ्यातून याच काळात सुटून हॅप्पी ही भारतीय एंबेसीमध्ये काम करणारा पंजाबी मुलगा खुशवंत सिंह उर्फ खुशीला (जस्सी गिल)भेटते. यानंतर कन्फ्यूजन आणि मजेदार ट्वीस्ट सुरु होतात. किडनॅपरला आता पहिल्या हॅप्पीला का पकडायचे आहे? दोन्ही हॅप्पीचे हे कन्फ्यूजन कसे होते? हे सर्व तुम्हाला चित्रपट पाहून कळेल.

दिग्दर्शक मुदस्सर अजीजच्या या स्क्रिप्टमध्ये काही गोष्टी मिसिंग असून चुकीच्या हॅप्पीलाच किडनॅपरला का पकडायचे आहे हे मिसिंग राहते. हसवण्यासाठी अजीजने चित्रपटात खुप मसाला टाकला आहे. जिम्मी शेरगिल आणि पीयूष मिश्राने संपुर्ण चित्रपटात हसवण्यात कोणतीही कसर सोडलेली नाही. संपुर्ण चित्रपटात जिम्मी आणि पीयूष लाइमलाइटमध्ये आहेत. दोघांची जुगलबंदी कमाल आहे. जस्सी गिलने आपल्या पहिल्या चित्रपटात खुशीच्या भूमिकेत चांगला परफॉर्मेंस दिला आहे. चित्रपटातील सोहेल सेनचे म्यूझिक चांगले आहे. जुने गाणे ‘मेरा नाम चिन-चिन चू…’ला पंजाबी फ्लेवरमध्ये सादर करण्यात आले आहे.