नासाच्या अॅपमधून घ्या व्हर्च्युअल स्पेससूटमध्ये सेल्फी काढण्याचा आनंद

nasa
वॉशिंग्टन – सेल्फी प्रेमींसाठी एक नवीन अॅप नॅशनल एरोनॅटिक्स अँड स्पेस अॅडमिनिस्ट्रेशन अर्थात नासाने लॉन्च केले असून तुम्ही या अॅपच्या मदतीने व्हर्च्युअल स्पेससूटमध्ये सेल्फी काढण्याचा आनंद लुटू शकता. तसेच यामध्ये ओरियन नेबुला आणि मिल्की वे गॅलेक्सीप्रमाणे कॉस्मिक लोकेशनची सुविधाही देण्यात आली आहे.

अमेरिकन स्पेस एजन्सीसुद्धा ‘एक्सोप्लॅनेट एक्सकर्शन्स व्हर्च्युअल रिअॅलिटी’ देखील ‘नासा सेल्फीज’ या अॅपनंतर हे अॅप लॉन्च करणार असल्याचे वृत्त आहे. आभासी वास्तवप्रणालीचा वापर करणाऱ्यांना ट्रॅपिस्ट-१ प्लॅनेटरी सिस्टिमकरिता हे अॅप मार्गदर्शन करणार आहे. या डिजिटल प्रोडक्ट्सचे लॉन्चिंग स्पित्झर स्पेस टेलिस्कोपच्या १५व्या वर्धापनदिनानिमित्त करण्यात आले होते, असे आपल्या निवेदनात नासाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. हे अॅप वापरण्यास अत्यंत सोयीचे असून तुमचा एक सेल्फी काढा. हवे असलेले बॅकग्राउंड निवडा आणि सोशल मीडियावर शेअर करा.

हे अॅप अँड्रॉईड आणि आयओएस या दोन्ही डिव्हाईसला सपोर्ट करते. तसेच याद्वारे आपल्याला फोटोंमागील विज्ञानाची माहितीही समजण्यास मदत होते. सेव्हन अर्थ साईज प्लॅनेटला होस्ट करू शकणारी ट्रॅपिस्ट-१ ही एकमेव एक्सोप्लॅनेट सिस्टीम आहे. स्पित्झरने या ग्रहांचा शोध लावून महत्त्वाची माहिती दिल्यामुळे शास्त्रज्ञांना ग्रहांच्या संभाव्य रचनांबद्दल जाणून घेण्यास मदत झाली आहे. या प्लॅनेटला प्रत्यक्ष पाहण्यास ट्रॅपिस्ट-१ प्रणाली अयशस्वी ठरते. पण या व्ही आर फीचरमुळे प्लॅनेटचा अनुभव घेता येऊ शकतो, असे नासातर्फे सांगण्यात आले आहे. ट्रॅपिस्ट-१ सिस्टिमचा अभ्यास करणाऱ्या स्पित्झर आणि इतर टेलिस्कोपकडून मिळालेल्या माहितीच्या आधारेच हा अनुभव घेता येऊ शकतो.

Leave a Comment