ई-सिगारेटमुळे हृदयविकाराचा धोका अधिक

cigarette
न्यूयॉर्क – नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या संशोधनातून इलेक्ट्रॉनिक सिगारेटच्या सेवनाने हृदयविकाराचा झटका येण्याची शक्यात वाढू शकते, असा निष्कर्ष समोर आला असून शास्त्रज्ञांनी साधारण सिगारेटपेक्षाही इलेक्ट्रॉनिक सिगारेट जास्त धोकादायक असल्याचे म्हटले आहे. साधारण सिगारेटला कमी हानीकारक पर्याय म्हणून इलेक्ट्रॉनिक सिगारेट उपयुक्त असते, हा समज या संशोधनाने मोडीत काढला आहे.

कॅन्सरची शक्यता इलेक्ट्रॉनिक सिगारेटमुळे साधारण सिगारेटपेक्षा कमी असली तरी हृदयविकाराचा धोका धूम्रपानापेक्षाही अधिक असतो, असे या संशोधनातून समोर आले आहे. ६९ हजार ४५२ लोकांचा सहभाग या प्रयोगात होता. त्यापैकी ई-सिगारेटचा वापर करणाऱ्या लोकांना हृद्यविकाराचा झटका येऊन गेल्याचे प्रमाण इतर लोकांपेक्षा अधिक असल्याचे आढळून आले. पण ई-सिगरेटचे सेवन थांबवल्यानंतर तातडीने हृद्यविकाराची शक्यता कमी होत असल्याचे प्रयोगात आढळून आल्यामुळे हृद्यविकाराचा झटका येण्याआधीच हे व्यसन त्वरित सोडा.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment