घराच्या तळघरात सापडली पुरातन काळातील पाच मजली इमारत

home
तुर्कस्तानमध्ये एक व्यक्ती आपल्या घराची साफसफाई करीत असताना त्याच्या नजरेला जे दृश्य पडले, त्याबद्दल ऐकून जो तो आश्चर्यात बुडाला आहे. घराच्या बेसमेंटच्या खाली असे काहीतरी अचानक पहावयास मिळेल अशी कल्पना त्या व्यक्तीने आपल्या स्वप्नातही केली नव्हती. बेसमेंटमध्ये जे सापडले, ते पाहून या व्यक्तीच्या आश्चर्याला आणि आनंदाला पारावार उरला नाही.
home1
ही घटना तुर्कस्तानातील नेविशेर प्रांतातील आहे. येथील एक रहिवासी आपल्या घराचे नूतनीकरण करण्याच्या उद्देशाने बेसमेंटची साफसफाई करीत असताना त्याला बेसमेंटची एक भिंत पोकळ असल्याचे जाणविले. भिंत खरेच पोकळ आहे किंवा नाही हे तपासून पाहण्यासाठी त्याने ही भिंत तोडून पाहण्याचे ठरविले. जेव्हा ही भिंत पाडली, तेव्हा बेसमेंटच्या खाली चक्क एक इमारत असल्याचे त्याच्या लक्षात आले. ही इमारत तब्बल पाच मजली असून, या ठिकाणी कधी काळी मानवी वस्ती असल्याचे पुरावेही या ठिकाणी मिळाले आहेत.
home2
ही इमारत ऐतिहासिक ग्रंथांमध्ये उल्लेख असलेले ‘डेरीनकुयू’ शहरातील असावी असा पुरातत्ववेत्त्यांचा अंदाज आहे. बेसमेंट खाली सापडलेली इमारत, ख्रिस्ती लोकांच्या सुरक्षिततेच्या उद्देशाने बनविलेला बंकर असावा असा अंदाज वर्तविण्यात येत आहे. या बंकर्सचा चा शोध गेली काही दशके सुरु होता, पण त्यामध्ये अद्याप यश आलेले नव्हते. हे शहर सत्तावीस मजली असावे असा पुरातत्ववेत्त्यांचा अंदाज आहे. मात्र सध्या या शहराचे केवळ पाचच माजले सापडले आहेत. या गुहेवजा इमारतीमध्ये दगडी दरवाजे देखील लावलेले पहावयास मिळाले आहेत.