ऑस्ट्रेलियाची हुवाई, झेडटीईच्या ५जी सेवांवर बंदी

huwaei
बीजिंग – हुवाई आणि झेडटीई या मोबाईल फोन आणि ५जी सेवांवर ऑस्ट्रेलियाकडून बंदी घालण्यात आली असून ऑस्ट्रेलियाने राजकीय वैमनस्यापोटी आणि दोन्ही कंपन्या चीनी असल्यामुळे बंदी घातली असल्याचा आरोप कंपन्यांकडून करण्यात आला आहे. ऑस्ट्रेलियामध्ये मागील पंधरावर्षापासून तेथील ग्राहकांना कंपनी उत्तम व सुरक्षित सेवा पुरवत आहे. पण ऑस्ट्रेलिया सरकारने कुठलेही ठोस कारण न देता आमच्या ५जी मोबाईलवर बंदी घातली असल्यामुळे ग्राहकांमध्ये निराशा पसरली आहे.

याबाबत ऑस्ट्रेलियन अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, तेथील कंपन्याना काही स्थानिक सरकारकडून पैसा पुरवला जात असल्याने ही कारवाई करण्यात आली आहे. शिवाय तेथील स्थानिक कंपन्यांवर परदेशी सरकारकडून दबाव आणला जातो. या कंपन्यांच्या कामात ते हस्तक्षेप करतात. देशाच्या सुरक्षेला यातून धोका निर्माण होऊ शकतो. या कंपन्यांकडून देण्यात आलेल्या ५जी नेटवर्कच्या सुरक्षतेबद्दल संभ्रम आहे. पण चीन किंवा कंपन्यांच्या नावाचा उल्लेख प्रस्तूत माहितीमध्ये कुठेही करण्यात आलेला नाही.

दरम्यान, विदेशात काम करणाऱ्या स्थानिक कंपन्यांची चीन नेहमीच मदत करतो. चीनच्या अर्थव्यवस्थेस यातून बळकटी मिळते. वैचारिक मतभेद विसरुन ऑस्ट्रेलियाने देशात उद्योगासाठी चीनी कंपन्याना चांगले वातावरण निर्माण करून द्यावे, असे चीनचे परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते लू कांग यांनी म्हटले आहे. पण कंपनीत स्थानिक सरकारचा हस्तक्षेप असल्याच्या आरोप हुवाईने फेटाळला आहे. सरकारकडून कुठलीही मदत कंपनी घेत नाही.

Leave a Comment