अॅपलने फेसबुकचे सिक्युरिटी अॅप स्टोअरमधून हटवले

apple
सॅन फ्रान्सिस्को – फेसबुकची मालकी असलेल्या ओनावो सिक्युरिटी अॅप्लिकेशन्सला अॅपलने गोपनीय मार्गदर्शकतत्त्वांचे उल्लंघन केल्यामुळे अॅप स्टोअरवरून काढून टाकले आहे. याबाबत प्रसारमाध्यमांनी दिलेल्या एका अहवालानुसार, फेसबुक अॅपलच्या नियमांचे पालन करत नसल्यामुळे अॅपल स्टोअरवरून स्वेच्छेने अॅप काढण्यासंबंधी फेसबुकला आयफोन बनवणाऱ्याने विचारले होते. पण स्वतः अॅप फेसबुकने न काढल्यामुळे अॅपलला हा निर्णय घ्यावा लागला.

अॅपलचे प्रतिनिधी याबद्दल माहिती देताना म्हणाले, की एखाद्या युझर्सच्या डिव्हाइसवर विश्लेषण, जाहिरात किंवा विपणनाच्या हेतूसाठी इतर अॅप्स कसे इन्स्टॉल केले याविषयी इतर अॅप्लिकेशन्सने माहिती मिळवू नये, असे आम्ही आमच्या मार्गदर्शक तत्त्वांमध्ये नमूद केले आहे. पण त्याचे उल्लंघन फेसबुक करत असून फेसबुकने युझर्सला डेटा वापरासंबंधी मदत करण्यासाठी २०१३मध्ये इस्राईलचे अॅनालिटीकल स्टार्ट-अप ओनावो विकत घेतले होते.

याबाबत फेसबुक प्रतिनीधी सांगतात की, ओनावो लोक डाऊनलोड करतात आम्ही त्यांना तेव्हा ते कसे वापरायचे याबद्दलच्या सूचना देत असतो. तसेच अॅपलच्या नियमांचे आम्ही नेहमीच पालन करत असतो, असेही ते म्हणाले. ओनावो व्हर्च्युअल प्रायव्हेट नेटवर्क किंवा व्हीपीएन अॅक्सेस वेब ब्राउझ करण्यासाठी आणि अधिक गोपनियतेसह अॅप डाउनलोड करण्यासाठी करत असते. ६५२ फेक अकाउंट रशिया आणि इराणमधून तयार केलेले होते. लॅटिन अमेरिका, ब्रिटन तसेच अमेरिकेतील लोकांना याद्वारे त्रास दिला जात असल्यामुळे फेसबुकने गेल्या मंगळवारी हे सर्व फेक अकाउंट्स आपल्या प्लॅटफॉर्मवरून काढून टाकले, अशी माहितीही त्यांनी दिली.

Leave a Comment