पुढच्या महिन्यात लॉन्च होणार आयफोनचे तीन स्मार्टफोन

apple
सॅन फ्रान्सिस्को – सप्टेंबर महिन्याच्या १२ तारखेला अॅपलकडून फोन आयफोन ९, आयफोन ११ आणि आयफोन ११ पल्स हे स्मार्टफोन लॉन्च करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे.

कंपनीकडून आयफोन ९मध्ये ६.१-इंच एलसीडी स्क्रीन देण्यात येऊ शकते. त्याचबरोबर आयफोन ११मध्ये ५.८-इंची तर ११ प्लसमध्ये ६.५ इंची OLED डिस्प्ले दिला जाऊ शकतो. याशिवाय पेडअप्स, कॅमेरा, सुधारित ७ एनएम ए ११ सीपीयू आणि यूएसबी-सी चार्जर देण्यात येणार असल्याचे सांगितले जात आहे.

२०१८ या वर्षातील आयफोन ९ हा अॅपलचा सर्वात स्वस्त स्मार्टफोन असेल. नवीन फोनवर अॅपलकडून आकर्षक ऑफर देण्यात येणार आहे. त्याचबरोबर फोनचे स्टोरेज ५१२ जीबीपर्यंत वाढवण्यात येणार असल्याचे एका मार्केट रिसर्च फर्मकडून सांगण्यात आले आहे. ६.१ इंच एलसीडी डिस्प्ले असलेल्या आयफोन ९ची किंमत ५० हजार ते ५२ हजार रुपयांपर्यंत अपेक्षित आहे. आताच आलेल्या आयफोन एक्सची किंमत ६५ हजार तर आयफोन एक्स प्लसची ६८ हजार होती. दरम्यान, याआधी आयफोनकडून मागील वर्षी १५ सप्टेंबरला फोन लॉन्च करण्यात आले होते. २२ सप्टेंबरला फोन ग्राहकांसाठी उपलब्ध करून देण्यात आले होते.

Leave a Comment