‘सॅमसंग गॅलेक्सी नोट ९’ भारतात लॉन्च

samsung
सॅमसंगने आपला बहुप्रतिक्षित गॅलेक्सी नोट ९ हा स्मार्टफोन अखेर भारतात लॉन्च केला असून या फोनची विक्री २४ ऑगस्टपासून सुरू होत आहे. कंपनीने हा फोन ९ ऑगस्ट रोजी न्यूयॉर्कमध्ये झालेल्या एका कार्यक्रमात सादर केला होता, तेव्हापासून फोनसाठी आगाऊ नोंदणी केली जात होती. अखेर नवी दिल्लीमध्ये आयोजीत एका कार्यक्रमात काल दुपारी १२ वाजता कंपनीने हा स्मार्टफोन लॉन्च केला आहे.

कंपनीने या स्मार्टफोनची किंमत किती असणार याबाबतही माहिती दिली आहे. सॅमसंग गॅलेक्सी नोट ९ च्या ६ जीबी रॅम आणि १२८ जीबी स्टोरेज असलेल्या व्हेरिअंटची किमत ६७ हजार ९०० रुपये तर, ८ जीबी रॅम आणि ५१२ जीबी स्टोरेज असलेल्या व्हेरिअंटची किंमत ८४ हजार ९०० रुपये एवढी ठेवण्यात आली आहे. कंपनीने यासोबतच नो-कॉस्ट इएमआयची सुविधा दिली आहे. या स्मार्टफोनवर सॅमसंगच्या शॉपमध्ये एक्सचेंज ऑफरही देण्यात आली आहे. या फोनवर एचडीएफसी बॅंकेकडून ६००० रुपयांच्या कॅशबॅकची ऑफर देण्यात येणार आहे.

Leave a Comment