एरिक्सनचे ५जी, आयओटी तंत्रज्ञानावर आधारीत भारतातील पहिले परीक्षण केंद्र

ericsson
गुरूग्राम – भारतात आपले पहिले परीक्षण केंद्र स्वीडिश टेलिकम्युनिकेशन कंपनी एरिक्सनने सुरू केले असून या केंद्राचा वापर जगातील नव्या तंत्रज्ञानाशी निगडीत विषयांवर अभ्यासासाठी होणार असल्याचे कंपनीकडून सांगण्यात आले आहे.

हरियाणा राज्यातील गुरूग्राम शहरात हे परीक्षण केंद्र सुरू करण्यात आले असून ५जी कनेक्ट ड्रोन आणि स्वयंचलित ट्रान्सस्पोर्ट सिस्टीम येथील एरिक्सन एक्सपिरियन्स स्टुडिओमध्ये बसवण्यात आली आहे. ५जी आणि आयओटी (इन्टरनेट ऑफ थिंग्स) तंत्रज्ञानावर आधारित उपकरणांचा वापर संपूर्ण स्टुडिओमध्ये करण्यात आला आहे.

कार्यक्रमाच्यावेळी दूरसंचार विभागाच्या सचिव अरुणा सुंदरराजन यांनी तंत्रज्ञानाच्या वापरात वेगाने प्रगती होत आहे. तंत्रज्ञान आणि नवकल्पनांच्या मदतीने कामाचा वेग वाढला आहे. नवीन तंत्रज्ञानाच्या साह्याने माणसाच्या राहणीमानात सकारात्मक बदल घडत आहेत, असे मत व्यक्त केले. काही दिवसांआधीच एरिक्सनने इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (आयआयटी) दिल्लीमध्ये ५जी सेंटर ऑफ एक्सलन्स अँड इनोव्हेशन लॅब सुरू केली आहे. स्टार्ट-अप उद्योग, शैक्षणिक व दूरसंचार विभागांना याची मदत होणार आहे. गुरुग्राममधील एरिक्सन स्टुडिओ याच धरतीवर सुरू करण्यात येत असल्याचे दक्षिणपूर्व आशिया ओशिनियाचे प्रमुख नितीन बन्सल म्हणाले.

Leave a Comment