लवकरच लॉन्च होणार गुगलचे ‘टेल मी समथिंग गुड’ फिचर

google1
सॅन फ्रान्सिस्को – लवकरच ‘टेल मी समथिंग गुड’ नावाचे फीचर गुगलकडून लॉन्च करण्यात येणार असून युझर्संना फीचरच्या माध्यमातून सकारात्मक दृष्टीकोन असलेल्या न्यूज गुगल दाखवणार आहे. या फिचरचे सध्या परिक्षण सुरू असून त्याचा वापर लवकरच करता येणार असल्याचे गुगलने सांगितले.

टेल मी समथिंग गुड गुगलला म्हणताच, तुम्हाला कष्टाने, आत्मविश्वासाने लोकांकडून संपादित करण्यात आलेल्या यशाच्या गोष्टी गुगलकडून सांगण्यात येतील. त्याचबरोबर दुः खावर मात करणाऱ्याच्या आणि सकारात्मकता वाढवणाऱ्या गोष्टींबद्दल माहिती देण्यात येणार आहे. सोल्यूशन जर्नालिझम नेटवर्कची यासाठी मदत घेतली जाणार आहे. सामाजिक विषयांवर आधारित पत्रकारिता करणारी सोल्यूशन जर्नालिझम नेटवर्क ही संस्था आहे. या माध्यमातून लोकांमध्ये सकारात्मक गोष्टींचा प्रसार केला जातो.

सर्व स्मार्टफोन तसेच गुगल होम स्मार्ट स्पीकर धारकांना हे नवीन फीचर वापरता येणार आहे. गुगल लवकरच आणखी एक स्मार्ट फिचर लॉन्च करणार आहे. ज्याच्या साह्याने दैनंदिन वापरातील सर्व इलेक्ट्रॉनिक उपकरणे एकाच ठिकाणावर बसून वापरता येणार आहेत. यामध्ये कॅमेरे, डिशवॉशर्स, डोअर बेल, ड्रायर, लाइट्स, थर्मोस्टॅट्स, सुरक्षा व्यवस्था, स्विचेस, व्हॅक्यूम, वॉशर, पंखे, लॉक, सेंसर्स, हीटर्स, एसी युनिट्स, रेफ्रिजरेटर्स, ओव्हन या गोष्टींचा समावेश करण्यात आला आहे.

Leave a Comment