लाखमोलाच्या फोनला टक्कर देणार शाओमीचा नवा ब्रँड

Poco
नवी दिल्ली : भारतीय बाजारपेठेत अल्पवधीतच आपले बस्तान बसविलेल्या चीनच्या शाओमी या मोबाईल कंपनीने एमआयनंतर आपला नवा ब्रँड भारतीय बाजारात आणला आहे. या ब्रँडचे नाव Poco असे असून त्यांचा Poco F1 हा पहिला मोबाईल भारतात आज लाँच करण्यात आला आहे.

शाओमी Poco F1 या मोबाईलमध्ये ६ जीबी रॅम आणि ६४/१२८ जीबी इंटर्लनल मेमरी देण्यात आली आहे. तर दुसऱ्या व्हेरीएंटमध्ये ८ जीबी रॅम आणि २५६ जीबी इंटर्लनल मेमरी देण्यात आली आहे. प्रिमियम श्रेणीमधला कंपनीचा हा फोन वनप्लस ६ आणि असुसच्या जेनफोन ५ झेड या फोनना टक्कर देणार आहे. अँड्रॉईड ८.१ ओरियो या सिस्टमवर हा फोन चालणार आहे. २९ ऑगस्टला दुपारी १२ वाजता या फोनची पहिली विक्री केली जाणार आहे. यावेळी काही ऑफर्सही मिळणार आहेत.

फ्लिपकार्ट आणि एमआय.कॉमवर पोको एफ1 या मोबाईलची विक्री सुरु होणार आहे. ६/६४ जीबी मोबाईलची किंमत २०९९९, तर ६/१२८ जीबी मोबाईलची किंमत २३९९९ आणि ८/२५६ जीबी मोबाईलची किंमत २८९९९ रुपये ठेवण्यात आली आहे. याचबरोबर एक आर्मड एडिशनची किंमत २९९९९ ठेवण्यात आली आहे. कंपनीने या फोनच्या विक्रीसाठी एचडीएफसी बँकेसोबत करार केला आहे. यानुसार १००० रुपयांची सूट मिळणार आहे. तसेच रिलायन्स जिओच्या वापरकर्त्यांना ८००० रुपयांचा कॅशबॅक आणि ६ टेराबाईट पर्यंतचा डेटा मोफत मिऴणार आहे.

Leave a Comment