जगभरातील युझर्सने व्हॉट्सअॅपवर मागील ३ महिन्यांत तब्बल ८५ अब्ज तास घालवले !

whatsapp
सॅन फ्रान्सिस्को – सध्याच्या घडीला सोशल मीडिया युझर्सच्या संख्येत लक्षणीय वाढ होत असून त्याचपार्श्वभूमीवर अमेरिकेत प्रसिद्ध झालेल्या फोर्ब्सच्या अहवालात जगभरातील सोशल मीडिया युझर्सने मागील ३ महिन्यांमध्ये तब्बल ८५ अब्ज तास व्हॉट्सअॅपवर घालवले असल्याचे म्हटले आहे.

जगातील सर्वात जास्त वापरले जाणारे व्हॉट्सअॅप हे मेसेजिंग अॅप आहे. व्हॉट्सअॅपचे जगभरात १.५ अब्ज युझर्स आहेत. व्हॉट्सअॅपची पालक कंपनी असलेल्या फेसबुक अॅपवर ३० अब्ज तास घालवले जातात. सर्वात जास्त वेळ सोशल मीडिया युजर्स मेसेजिंग अॅप्सवर घालवतात. व्हॉट्सअॅप, वी-चॅट, फेसबुक, मेसेंजर, पेंडोरा, यूट्यूब, इन्स्टाग्राम, ट्विटर, गुगल मॅप्स आणि स्पॉटइफ ह्या दहा अॅप्सचा वापर युझर्सकडून सर्वात जास्त केला जातो.

फेसबुकच्या मालकीचे टॉप दहा वापरण्यात येणाऱ्या अॅप्सपैकी फेसबुक, मेसेंजर, इन्स्टाग्राम आणि व्हॉट्सअॅप हे चार अॅप्स आहेत. शिवाय गुगलच्या मालकीचे गुगल मॅप्स आणि यूट्यूब आहेत. पण चीनमध्ये थोडे वेगळे चित्र पाहायला मिळते. तेथील स्थानिक अॅप्स चीनमध्ये लोकप्रिय आहेत.

सर्वेक्षणानुसार दुसऱ्या क्रमांकावर वी-चॅट अॅप असून याशिवाय मोबाईल गेम्स स्मार्टफोन युझर्सकडून खेळले जातात. यामध्ये सर्वात जास्त क्लॅश ऑफ क्लॅन्स खेळ खेळला जातो. युझर्सची टॉकिंग टॉम, कँडी क्रश सागा, फोर्टनेइट, लॉर्ड्स मोबाइल, सबवे सर्फर्स, हेलिक्स जंप, स्लॅथ इओ, पब्जी, फिशडोम खेळांना पसंती आहे.

मोबाईलवर सरासरीपेक्षा जास्त वेळ अमेरिकेतील प्रौढ वयोगटातील लोकांकडून घालवला जातो, असे नुकतेच प्रकाशित झालेल्या अभ्यासात सांगितले आहे. भारतातील परिस्थिती यापेक्षा वेगळी नाही. व्हॉट्सअॅप मेसेजिंग अॅपचा वापर भारतात सर्वात जास्त केला जातो. दिवसेंदिवस मोबाईल अॅप्सची संख्या वाढत आहे. याचा परिणाम आपल्यावर नक्कीच होणार आहे. मोबाईलचा वापर कसा कमी करता येणार, याकडे युझर्सने लक्ष देणे गरजेचे आहे.

Leave a Comment