भारतीय कायद्यांचे व्हॉट्सअॅपने काटेकोर पालन करावे – रविशंकर प्रसाद

ravi-shankar-prasad
नवी दिल्ली – देशात सध्या व्हॉट्सअॅपवरून चुकीचे मेसेज प्रसारीत झाल्याने मॉब लिंचिंगच्या घटना वाढ झाल्यानंतर, मंगळवारी व्हॉट्सअॅपला केंद्रीय माहिती व प्रसारणमंत्री रविशंकर प्रसाद यांनी कायद्याचे पालन करण्याचे निर्देश दिले आहेत. भारतीय कायद्याचे व्हॉट्सअॅपने काटेकोर पालन करावे आणि त्यांच्या अॅपचा होणारा दुरुपयोग थांबविण्यासाठी योग्य ती पावले उचलावीत, असे म्हटले आहे. डॅनियल यांना भेटल्यानंतर प्रसाद हे प्रसार माध्यमांशी बोलत होते.

या दरम्यान प्रसाद म्हणाले, भारतात मोठ्या प्रमाणावर व्हॉट्सअॅप वापरले जाते. व्हॉट्सअॅपने देशात चांगले कामही केले आहे. माग, ते शैक्षणिक क्षेत्र असेल वा केरळमधील सध्याची परिस्थिती असो, जनतेची मदत करण्याचे काम केले आहे. पण याच्या होणाऱ्या दुरुपयोगाची मला चिंता असल्यामुळे मॉब लिंचिंग आणि रिव्हेंज पोर्न सारख्या घटना घडत आहेत. हे रोखण्यासाठी कंपनीला आवश्यक ती पावले उचलावी लागतील. डॅनियल्स आणि प्रसाद यांची बैठक होण्यापूर्वी देशभरात अनेक मॉब लिचिंगच्या घटना झाल्या आहेत. याला सोशल साईटवरील फेक मैसेज जबाबदार असल्याचे बोलले जाते.

Leave a Comment