व्होडाफोन आपल्या ग्राहकांना घडवणार दुबईची सैर

vodafone
नवी दिल्ली – टेलिकॉम कंपनी व्होडाफोन इंडियाने ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी एका आगळ्यावेगळ्या स्पर्धेची घोषणा केली आहे. कंपनीने यासाठी एक गेमिंग कॉन्टेस्ट आयोजीत केला आहे. या स्पर्धेचे नाव ‘The Vodafone Travel Passport’ असे असून या स्पर्धेत मायव्होडाफोन अॅपद्वारे सहभागी होता येणार आहे. ही स्पर्धा एका महिन्यापर्यंत सुरू राहणार असून याची सुरूवात आजपासून झाली आहे. मोफत दुबईची यात्रा करण्याची संधी या स्पर्धेतील विजेत्याला मिळणार आहे.

आपल्यासोबत ग्राहकांना कायम ठेवण्यासाठी या स्पर्धेचे आयोजन व्होडाफोनने केले आहे. व्होडाफोनने या स्पर्धेसाठी ‘ईजीमायट्रिप’सोबत भागीदारी केली आहे. ग्राहकांनी याद्वारे पर्यटन स्थळ शोधायची आहेत. लपलेले पर्यटन स्थळ शोधल्यास विजेत्याला रोज ‘ईजीमायट्रिप’कडून ४०० रुपयांचे कुपन देण्यात येईल. तसेच विजेत्याला भारतातील कोणत्याही ठिकाणी तीन दिवस आणि दोन रात्री हॉटेलमध्ये मोफत राहण्याची संधी आहे. तर संपूर्ण स्पर्धा संपल्यानंतर एका भाग्यशाली विजेत्याला दुबईच्या यात्रेचे पॅकेज जिकण्याची संधी आहे. या स्पर्धेमध्ये पोस्टपेड आणि प्री-पेड अशा दोन्ही ग्राहकांना सहभागी होता येणार आहे.

Leave a Comment