दुर्गंधीयुक्त फुल पाहण्यासाठी पर्यटकांची संग्रहालयात गर्दी

flower
अमेरिकेतील एका संग्रहालयात फुललेले फुल पाहण्यासाठी पर्यटकांनी शुक्रवारी गर्दी केली होती. मात्र हे फुल इतर फुलांसारखे सुवासिक नव्हते तर अत्यंत दुर्गंधीयुक्त होते.

कॉर्प्स फ्लॉवर (मृतदेहाचे फूल) किंवा स्टिंक (दुर्गंध) असे या फुलाचे नाव आहे. दक्षिण कॅलिफोर्नियातील हंटिग्टन लायब्ररी या संग्रहालयात हे फूल फुलले होते. हे फूल पूर्ण उमलते तेव्हा ते सडका वास पसरवते. गुरुवारी हे फूल अचानक उमलण्यास सुरूवात झाली, असे हंटिग्टन लायब्ररीच्या प्रवक्त्या लिसा ब्लॅकबर्न यांनी असोसिएटेड प्रेस या वृत्तसंस्थेला सांगितले.

“आम्हाला आणखी काही दिवस मिळतील, असे वाटले होते. मात्र ते तयार होते आणि खूप प्रेक्षणीय होते. ते दिसायला अगदी असामान्य असते आणि अत्यंत तीव्र दुर्गंध सोडण्याबद्दल ते प्रसिद्ध आहे. त्यामुळे वनस्पतिशास्त्रात रस असलेल्या लोकांना त्यात खूप रस असतो,” असे त्या म्हणाल्या.
कॉर्प्स फ्लॉवर या फुलाला पूर्ण फुलण्यासाठी साधारण 15 वर्षे लागतात आणि त्याचा फुलोरा केवळ 24 तास टिकतो.

“त्याचा वास सडक्या मांसासारखा किंवा सडणाऱ्या उंदरासारखा होता,” असे हंटिग्टनमधील पुष्पतज्ञ ब्रँडन टॅम यांनी सांगितले.

Leave a Comment