शरीरातील नवीन अँटीबायोटिक तयार करू शकणारा घटक शोधण्यात शास्त्रज्ञांना यश

MIT-Scientists
न्यूयॉर्क – शास्त्रज्ञांना मानवी शरीरातील नवीन अँटीबायोटिक तयार करू शकणारा घटक शोधण्यात यश आले असून हा घटक शरीरातील हानीकारक बॅक्टेरियांवर नियंत्रण ठेवण्यात उपयुक्त ठरू शकेल. पेप्सीनोजेन प्रोटीनमधील हा घटक एमआयटी व नेपल्स फेडेरिको विद्यापीठातील शास्त्रज्ञांनी शोधून काढला. सालमोनेला व कोली यांसारख्या बॅक्टेरियांवर मात करण्यासाठी अन्नपचनासाठी उपयुक्त असलेला हा घटक उपयुक्त ठरेल, असा शास्त्रज्ञांचा कयास आहे.

सेवन केलेल्या अन्नाचे विघटन करून शरीराला आवश्यक ऊर्जा पेप्सीनोजेन हा घटक पुरवतो. पेप्सीनोजेनशी शरीरातील हायड्रोक्लोरीक अॅसिड मिश्रण पावून अन्नाचे पेप्सीन ए या घटकात रुपांतर करतो. अद्याप शास्त्रज्ञ पेप्सीन ए या घटकाच्या कार्याबद्दल अनभिज्ञ होते. पण त्याचे प्रयोजन शोधून काढण्यात आले असून अॅन्टीमायक्रोबियल म्हणून तो कार्य करत असल्याचे समोर आले आहे. यासंबंधीचा सविस्तर शोधनिबंध एसीएस सिन्थेटिक बायोलॉजी जर्नलमध्ये प्रसिद्ध झाला असून मानवी शरीरातील अँटीबॅक्टेरिया म्हणून काम करणाऱ्या घटकांचा अल्गोरिदम शास्त्रज्ञांच्या गटाने विकसीत केला आहे. शरीरात असणाऱ्या जवळपास २ हजार प्रकारच्या प्रोटीन्सपैकी ८०० प्रोटीन अँटीबॅक्टेरीया म्हणून उपयुक्त ठरत असल्याने या अल्गोरिदममध्ये याचा सामावेश करण्यात आला आहे.

वेगवेगळ्या पातळीवर नवीन शोधण्यात आलेल्या या घटकाची पडताळणी केल्यावरच हा घटक अँटीबॅक्टेरिया म्हणून उपयुक्त ठरेल हा निष्कर्ष शास्त्रज्ञांनी काढला आहे. मानवी शरीराला बॅक्टेरियाची लागण होण्याची शक्यता असते. या शोधामुळे बॅक्टेरियाचा संसर्ग टाळण्यासाठी प्रभावी उपाय शोधता येतील, असे या प्रकल्पातील शास्त्रज्ञाने म्हटले. हा घटक त्वचेसंबंधीच्या संसर्गावरही कार्य करत असून पेप्सीनोजेन हा घटक भविष्यात प्रमुख अँटीबायोटिक म्हणून वैद्यकशास्त्रात उपयोगाला येईल. त्यासाठी या पेप्टाईड्सवर पुढील संशोधन चालू असल्याचेही त्यांनी म्हटले.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment