सॉफ्टवेअर डेव्हलपर्स कंपन्यांना व्यासपीठ तयार करून देणार पेटीएम

paytm
बंगळुरू – पेटीएमकडून सॉफ्टवेअर डेव्हलपर्स कंपन्यांना आर्टिफिशीअल इन्टेलीजन्सवर आधारित अॅप बनवण्यासाठी व्यासपीठ तयार करून देण्यात येणार असून पेटीएमकडून आर्टिफिशीअल इन्टेलीजन्ससहीत क्लाऊड कॉम्प्युटिंगचा वापर करून अॅप बनवणाऱ्यांसाठी चांगली संधी असल्याचे सांगण्यात आले आहे. कंपनीकडून पहिल्यांदाच अलिबाबा आणि पेटीएम यांच्यातील करारानंतर मोठी घोषणा करण्यात आली आहे.

पेटीएमसाठी व्यवसाय-केंद्रीत अॅप सहभागी कंपन्यांना बनवावे लागणार आहे. उच्च-गुणवत्तेवर आधारीत उत्तम स्वयंचलित कार्यप्रणाली ज्यामध्ये असावी. त्याचबरोबर पेमेंट वॉलेटचा युझर्सला ज्याची मदत व्हायला हवी. शिवाय स्वंयमचलित ग्राहक संबंध व्यवस्थापन करता यावे. ग्राहकांच्या माहितीची गोपनीयता कंपनीकडून पाळली जाते. फक्त भारतीय सर्व्हरकरीता पेटीएम युझर्सची सर्व माहिती खुली आहे. यातील कुठल्याही माहितीचा प्रसार होणार नाही, याची पुरेपुर काळजी कंपनीकडून घेतली जाते. युझर्सची कुठलीही माहिती आपल्या परकीय गुंणतवणूकदारांना कंपनी देत नाही, असे पेटीएमचे उपाध्यक्ष सुजीत कुमार मिश्रा यांनी सांगितले.

Leave a Comment