आता भारतीयांना परवडणार परदेशवारी

tour
नवी दिल्ली : सध्या रुपया डॉलरच्या तुलनेत घसरल्याने देशभरात टीका सुरु असतानाच परदेशवारीच्या विचारात असणाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. भारतीय रुपयाप्रमाणेच इतर देशांच्या चलनातही मोठी घसरण झाल्याने तेथील देशांमध्ये फिरायला जाणे आता भारतीयांना परवडणार आहे.

सध्या मोठे आर्थिक संकट तुर्कस्तानमध्ये आले असल्यामुळे तेथील चलन लिरा खूपच घसरले आहे. तर भारताचा रुपया हे डॉलरच्या तुलनेत सर्वाधिक घसरणारे आशियातील चलन असल्यामुळे रुपया ज्या देशांच्या चलनांच्या तुलनेत अद्याप मजबूत आहे, त्या देशांमध्ये फिरायला जाणे केव्हाही स्वस्त ठरणार आहे. याबाबत एका अर्थतज्ज्ञांनुसार दक्षिण ऑफ्रिकेचे रँडमध्ये १० टक्के, तुर्कस्तानच्या लिरामध्ये ६० टक्के आणि इंडोनेशियाच्या रुपयामध्ये ४ ते ५ टक्क्यांची घसरण झाली असल्यामुळे या देशांमध्ये जाणे भारतीय पर्यटकांना अधिक सोईस्कर होणार आहे. दक्षिण ऑफ्रिका, तुर्कस्तान, इजिप्त आणि बाली या देशांसाठी या हिवाळ्यामध्ये पर्यटकांची रीघ लागणार आहे.

यात्रा डॉट कॉमनुसार सध्या तुर्की, इंडोनेशिया, न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया या देशांना पर्यटकांची वाढती मागणी आहे. तर लंडन, युरोप, सिंगापूर आणि हाँगकाँग या देशांची मागणी कमी होत आहे. कारण तेथील चलन रुपयाच्या तुलनेत अद्यापही मजबूत आहे. डॉलर, युरो सारख्या चलनांसोबत ऑस्ट्रेलियाचा डॉलरही जवळपास स्थिर राहिला आहे.

Leave a Comment