चंद्रयान-१ ने पाठविलेल्या डेटामधून चंद्रावर बर्फाच्छादित प्रदेश असल्याचे निष्पन्न

moon
नासाने नुकत्याच जाहीर केलेल्या माहितीनुसार, चंद्रावरील सर्वात थंड आणि अंधाऱ्या भागांमध्ये अनेक ठिकाणी बर्फाच्छादित प्रदेश असल्याचे शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे. चंद्रयान-१ या अंतरीक्षयानाने पाठविलेल्या डेटानुसार शास्त्रज्ञांनी ही माहिती दिली आहे. हे चंद्रयान भारताने दहा वर्षांपूर्वी अवकाशामध्ये पाठविले होते. चंद्रावर बर्फाच्छादित प्रदेश असल्यामुळे भविष्यामध्ये पाठविलेया जाणाऱ्या मिशन्समध्ये चंद्रावरील पाण्याचे परीक्षण आणि त्याचा वापर करणे शक्य होणार असल्याचे शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे. पाणी जीवनावश्यक असल्याने जर याची उपलब्धता चंद्रावर असली, तर चंद्रावर मनुष्याला राहता येणे हे शक्य असल्याचे शास्त्रज्ञ म्हणतात.
moon1
हा बर्फाच्छादित प्रदेश एकसंध नसून, तुकड्या-तुकड्यांमध्ये विखुरलेला असून, याचे अस्तित्व अनेक शतकांपासून असण्याची शक्यता शास्त्रज्ञांनी व्यक्त केली आहे. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर बर्फ, ‘चंद्रावरील खड्ड्यांच्या ( ल्युनार क्रेटर्स ) सभोवताली असून, उत्तरी ध्रुवावरील बर्फाच्छादित प्रदेशाचा विस्तार अधिक असल्याचे निदान डेटामार्फत झाले आहे. भारताने पाठविलेले चंद्रयान-१ हे अवकाशयान, चंद्रावर बर्फ आहे किंवा नाही हे शोधून काढण्याच्या उद्देशानेच ‘इस्रो’ या भारतीय स्पेस एजन्सीतर्फे पाठविले गेले होते.
moon2
चंद्राचा ‘रोटेशन अॅक्सीस’ ( त्याच्या अॅक्सीस वरील झुकाव )अतिशय कमी असून, सूर्याची किरणे चंद्राच्या काही भागांपर्यंत पोहोचू शकत नाहीत, त्यामुळे या भागांमध्ये उष्णतेचा अभाव असल्याने तापमान अतिशय कमी असते, तसेच सूर्याचा प्रकाश या भागांपर्यंत पोहोचत नसल्याने हे भाग कायम गडद अंधारामध्ये बुडालेले असतात. त्यामुळेच हे बर्फाच्छादित प्रदेश येथे निर्माण झाले असल्याचे वैज्ञानिकांचे म्हणणे आहे.

Leave a Comment