व्हिएतनामचे सैनिक का वापरत आहेत महिलांचे सॅनिटेरी पॅड्स?

pad
व्हिएतनामचे सैनिक सोशल मीडियावर महिलांचे सॅनिटेरी पॅड वापरत असल्यामुळे व्हायरल होत आहे. परंतु, हे सैनिक युद्धात किंवा प्रशिक्षणात सॅनिटेरी पॅड का वापरत आहेत असा प्रश्न अनेकांना पडला आहे. यासंदर्भातील काही फोटो चीनच्या यू शुआन फॅन ग्रुपने आपल्या फेसबूक पेजवर शेअर केले आहेत. तसेच असे करणारे व्हिएतनामचे सैनिकच नाही, तर प्रशिक्षण, मोहिमा आणि युद्धांत चीनचे आणि इतर काही आशियाई देशांचे सैनिक सुद्धा सॅनिटेरी पॅड वापरत असल्याचा खुलासा केला. सोबतच, त्याचे कारण सुद्धा लिहिले आहे.
pad1
व्हिएतनामचे सैनिक फेसबूकवर शेअर करण्यात आलेल्या काही फोटोंमध्ये आपल्या बूटांमध्ये सॅनिटेरी पॅड लावताना दिसून येतात. आपल्या बूटांमध्ये या पॅडचा कुशन म्हणून ते वापर करत आहेत. २४ तासांपेक्षा अधिक वेळ सैनिकांना बूट बदलता किंवा काढता येत नाही. अशात बूटांसोबत महागडे सॉक्स सुद्धा कुचकामी ठरतात. बूटांमध्ये सॅनिटेरी पॅड घालण्याचा सर्वात मोठा फायदा म्हणजे, हे बूटांमध्ये पायांना येणारा घाम शोषूण घेतात. तसेच दुर्गंध सुद्धा येत नाही. एवढेच नव्हे, तर जास्त वेळ एकच सॉक्स घातल्यास बॅक्टेरिया आणि इन्फेक्शनचा धोका असतो. परंतु, सॅनिटेरी पॅड घातल्याने बॅक्टेरिया आणि त्यापासून होणाऱ्या संक्रमणाचा धोका सुद्धा कमी होतो.
pad2
या संदर्भात नेक्स्टशार्क डॉटकॉमच्या वृत्तानुसार, चीनचे सैनिक सुद्धा अशा प्रकारे सॅनिटेरी पॅडचा वापर करतात. तर इंडिपेंडंटच्या वृत्तानुसार, काही दिवसांपूर्वी चीनच्या एका विद्यार्थ्याने सॅनिटेरी पॅड्सला रीपॅकेज केले होते. जेणेकरून तरुणांना ते खरेदी करताना संकोच वाटणार नाही. चीनचे महाविद्यालयीन विद्यार्थी सुद्धा आपल्या बूटांमध्ये सॅनिटेरी पॅड वापरतात.

Leave a Comment