तरुणीच्या वर्णावर सोशल मिडीयावर प्रतिक्रियांचा महापूर

tain
सोशल मिडिया हे असे माध्यम आहे, ज्याच्या द्वारे कोणतीही व्यक्ती अगदी थोड्याच अवधीत प्रसिद्धी मिळवू शकते. एका एकोणीस वर्षीय मुलीने देखील आपले छायाचित्र सोशल मिडीयावर प्रसिद्ध केल्यानंतर तिची छायाचित्रे बघून जगभरातून निनिराळ्या प्रतिक्रिया या छायाचित्रांवर पाहण्यास मिळत आहेत. ही छायाचित्रे इतकी प्रसिद्ध झाली आहेत, की मूळची अमेरिकन असलेली ही तरुणी आता पॅरिसच्या फॅशनच्या झगमगत्या दुनियेमध्ये नाव कमावते आहे.
tain1
मॉडेलिंगच्या दुनियेमध्ये प्रसिद्ध असणाऱ्या या तरुणीचे नाव खुदिया डायप आहे. पण यशाच्या या शिखरापर्यंत पोहोचण्याआधी डायपला अनंत अडचणींना तोंड द्यावे लागले. तिचा वर्ण हे तिच्या निंदेचे कारण बनला. अगदी लहानपणापासून खुदियाला तिच्या वर्णावरून केल्या गेलेल्या अपमानांना सातत्याने तोंड द्यावे लागत असे. तिच्या वर्णावरून लोक तिची थट्टाही करीत असत. पण तरीही खुदियाने आपल्या वर्णावरून कधीही स्वतःमध्ये कमीपणाची भावना येऊ दिली नाही. अखेरीस तिच्या परिश्रमांना यश आले, आणि त्याच्या फलस्वरूप खुदिया आज एक आंतरराष्ट्रीय पातळीवर प्रसिद्धी मिळवलेली मॉडेल म्हणून ओळखली जाते.
tain2
खुदियाची ही यशस्वी वाटचाल तिच्या बहिणींसाठी प्रेरणास्रोत ठरत आहे. आता खुदिया एकोणीस वर्षांची असून, व्यक्तीचे सौंदर्य केवळ तिच्या वर्णावर अवलंबून नसल्याचे ती म्हणते. तसेच कोणत्याही व्यक्तीने दुसऱ्या व्यक्तीचे व्यक्तिमत्व, गुण न पाहता केवळ तिच्या वर्णावरून तिची पारख करणेही चुकीचे असल्याचे खुदियाचे मत आहे. एखाद्याच्या वर्णावरून त्याची चेष्टा, अपमान केल्यास त्या व्यक्तीचा आत्मविश्वास खालावतो आणि आणि कितीही हुशारी, कलागुण असले, तरी केवळ आत्मविश्वास नसल्याने ती व्यक्ती आयुष्यामध्ये अयशस्वी ठरते. त्यामुळे व्यक्तीचा वर्ण न पाहता, त्याचे कर्तृत्व, कलागुण आणि बुद्धिमत्ता पाहिली जाणे आवश्यक असल्याचे खुदिया म्हणते.

Leave a Comment