आता टाटा स्काय तर्फेही गिगाफायबरद्वारे ब्रॉडबँड सेवा

tata-sky
रिलायंस जिओच्या वतीने ‘जियो गिगाफायबर’ द्वारे हायस्पीड इंटरनेट सेवा सुरु करण्यात येण्याची घोषणा करण्यात आल्यानंतर या योजनेशी प्रतिस्पर्धा करण्यासाठी डीटीएच सर्व्हिस प्रोव्हायडर टाटा स्कायच्या वतीने देखील नागरिकांसाठी हायस्पीड इंटरनेट सेवा देणारी ब्रॉडबँड सेवा सुरु होत असल्याची घोषणा करण्यात आली आहे. जियो गिगाफायबरसाठी रजिस्ट्रेशन सुरु झाले असून, ही सेवा अद्याप सुरू व्हायची आहे. त्यामुळे या योजनेशी प्रतिस्पर्धा करण्याच्या उद्देशाने इतर ब्रॉडबँड सर्व्हिस प्रोव्हायडरही आता आपली कंबर कसत आहेत. या सर्व्हिस प्रोव्हायडर्सच्या यादीमध्ये टाटा स्काय ब्रॉडबँडचाही समावेश आहे. टाटा स्कायच्या वतीने सध्या भारतभरातील बारा शहरांमध्ये ब्रॉडबँड सेवा पुरविण्यात येणार असल्याचे समजते. तसेच या सेवेअंतर्गत ग्राहकांसाठी निरनिराळे प्लॅन्स उपलब्ध करून देण्यात आले आहेत. 100mbps च्या स्पीडपर्यंतची इंटरनेट सेवा या ब्रॉडबँड सेवेच्या द्वारे पुरविण्यात येणार आहे.
tata-sky1
सध्या टाटा स्काय ब्रॉडबँड सेवा भारतातील बारा शहरांमध्ये पुरविण्यात येणार असून, यामध्ये मुंबई, ठाणे, दिल्ली, गाझियाबाद, गुरूग्राम, नॉयडा, पुणे, भोपाल, चेन्नई, बेंगळूरू, अहमदाबाद, आणि मीरा भायंदर या शहरांचा समावेश आहे. ही ब्रॉडबँड सेवा एखाद्या ठिकाणी उपलब्ध आहे किंवा नाही हे पाहण्यासाठी कंपनीच्या औपचारिक वेबसाईटद्वारे ग्राहकांना कंपनीशी संपर्क साधता येणार आहे. ही ब्रॉडबँड सेवा एक, तीन, पाच आणि नऊ महिन्यांच्या प्लॅन्समध्ये उपलब्ध होणार असून, ग्राहक जो प्लॅन निवडतील, त्यावर इंटरनेटचा स्पीड आणि डेटा अवलंबून असणार आहे.
tata-sky2
या सेवेचे एक महिन्यासाठीचे पॅकेज ५, १०, ३०, ५० आणि 100 mbps स्पीड उपलब्ध करून देणारे आहे. यासाठी अनुक्रमे ९९९, १५००, १८००, आणि २५०० रुपये दर आकरण्यात येणार आहे. ग्राहकांना आपल्या सोयीनुसार पॅकेज निवडण्याची मुभा असेल. हे सर्व डेटा प्लॅन्स ‘अनलिमिटेड’ असणार आहेत. या व्यतिरिक्त ६०जीबी चा डेटा प्लॅनही कंपनीच्या मार्फत ९९९ रुपयांमध्ये उपलब्ध करून देण्यात येणार आहे. तसेच १२५ जीबी डेटा प्लॅन १२५० रुपयांमध्ये उपलब्ध असणार आहे. या ब्रॉडबँड सेवेअंतर्गत राउटर मोफत देण्यात येणार असून, ग्राहकांना १२०० रुपये इन्स्टॉलेशन साठी मोजावे लागणार आहेत.

Leave a Comment