लवकरच येत आहे स्नॅपचॅटचे नवीन व्हर्जन अॅन्ड्रॉइड

snapchat
सॅन फ्रान्सिस्को – लवकरच फोटो-मेसेजिंग अॅप स्नॅपचॅटचे नवीन व्हर्जन अॅन्ड्रॉइड यूजरसाठी येणार असून सध्या रीडिझाइन अॅपचे परीक्षण सुरू आहे. त्यानंतर लवकरच हे अपडेटेड व्हर्जन लॉन्च करण्यात येणार असल्याचे कंपनीकडून सांगण्यात आले आहे.

अल्फाव्हर्जनचा वापर अपडेटेड स्नॅपचॅट अॅपमध्ये करण्यात आला असून यूजरकरीता येणारे व्हर्जन अॅन्ड्रॉइड चांगला अनुभव देणारे ठरणार आहे. नवीन व्हर्जनमध्ये जुन्या अॅप्सच्या तुलनेत जास्त फिचर्स देण्यात आली आहेत. शिवाय विविध इमोजी ब्रशचा वापर करता येणार आहे. परंतू काही प्रमाणात रीडिझाइन अॅपमध्ये अडचणी असल्याचे परीक्षणादरम्यान लक्षात आले आहे. लवकरच येत असलेल्या या अडचणी काढुन टाकण्यात येणार असल्याचे कंपनीकडून सांगण्यात आले.

अॅपचे याआधी मागील वर्षी रीडिझाइन करण्यात आले होते. पण यूजर्सला रीडिझाइन अॅपमध्ये अनेक अडचणींचा सामना करावा लागत असल्यामुळे पुन्हा जुनेच व्हर्जन कार्यरत करावे लागले होते. कंपनीला त्यावेळी यूजर्सच्या रोषाला सामोरे जावे लागले होते. शिवाय यामुळे कंपनी यूजर्सच्या संख्येमध्ये घट दिसून आली होती.

Leave a Comment