या चिमुकल्याचा विचित्र आजार पाहून तज्ञही पडले बुचकळ्यात

baby
जगामध्ये चित्रविचित्र विकार, व्याधी असलेल्या अनेक व्यक्ती आहेत. यांचे विकार अतिशय दुर्मिळ असून , अनेकदा वैद्यकीय तज्ञांना देखील या विकारांनी बुचकळ्यात टाकले आहे. असाच विकार एका सहा वर्षांच्या मुलाच्या बाबतीत उद्भविला आहे. हा लहानगा आपल्या वास्तविक वयापेक्षा किती तरी पटीने अधिक वयस्क दिसत आहे. या मुलाची सोशल मिडीयावर सध्या व्हायरल होत असलेली छायाचित्रे पाहून, या मुलाचे वय केवळ सहा वर्षांचे आहे, यावर विश्वास बसणे कठीण झाले आहे. प्रसारमाध्यमांनी प्रसिद्ध केलेल्या वृत्तांनुसार या मुलाला असा विकार झाला आहे, ज्यामुळे त्याच्या चेहऱ्यावर विलक्षण सुरकुत्या पडल्या आहेत. या सुरकुत्यांमुळे या सहा वर्षांच्या मुलाचा चेहेरा एखाद्या साठ वर्षांच्या वृद्धाप्रमाणे दिसू लागला आहे. तज्ञांच्या मते ही व्याधी अनुवांशिक आहे.
baby1
उत्तर पूर्वी कझाकस्तान मधील अस्थाना शहरामध्ये राहणाऱ्या यार्नार अलीबेकोव्ह या मुलाला या दुर्मिळ व्याधीने ग्रासले आहे. यार्नारची प्रकृती जन्मल्याबरोबर अगदी व्यवस्थित होती. मात्र जन्माच्या एक महिन्यानंतर त्याला एलहर्स-डॅनलोस सिंड्रोम या व्याधीने ग्रासले. जसजसे यार्नारचे वय वाढू लागले, तसतसा त्याचा चेहरा जास्त वयस्क दिसू लागला. या व्याधीमुळे यार्नारचे वय सहा वर्षांचे असूनही एकदम साठ वर्षांचे असल्याप्रमाणे भासू लागले.
baby2
तज्ञांच्या मते या जगामध्ये ही व्याधी अतिशय दुर्मिळ असून, या व्याधीवर उपचार करविणे ही यार्नारच्या पालकांच्या पुढील मोठी समस्या आहे. या व्याधीवरील उपचारांसाठी त्यांनी आपले आप्तस्वकीय आणि मित्रपरिवाराकडून मदत मागितली असून, स्थानिक सरकारी रुग्णालयाकडूनही यार्नारच्या पालाकंनी मदत मागितली आहे.

Leave a Comment