१२ वर्षीय विद्यार्थ्यावर ३४ वर्षीय शिक्षिकेने केला बलात्कार, शिक्षा भोगल्यानंतर त्याच्याशीच केले लग्न

student
वॉशिंग्टन – अमेरिकेतील ३४ वर्षीय एक शिक्षिका आणि तिच्या किशोरवयीन विद्यार्थ्याची ही कहाणी असून प्रेमापासून ते लग्नापर्यंतचा त्यांचा प्रवास खूप अडचणींचा होता. जेव्हा पहिल्यांदा शिक्षिका मेरीने विलीशी संबंध बनवले तेव्हा तो फक्त १२ वर्षांचा होता. मेरी यानंतर प्रेग्नंट झाली आणि तिला अल्पवयीनावर बलात्कारप्रकरणी दोषी ठरवण्यात आल्यानंतर तिला तुरुंगात जावे लागले होते. दुसरीकडे अल्पवयीन विद्यार्थ्यावर त्यांच्या जन्मलेल्या मुलांची जबाबदारी आली. त्या दिवसांचे अनुभव शेअर करत त्याने सांगितले की, ते दिवस आयुष्यातील सर्वात काळे दिवस होते.
student1
सन १९९६ची ही गोष्ट असून विली सिएटलमध्ये तेव्हा ६व्या इयत्तेत शिकत होता आणि मेरी शाळेत त्याची शिक्षिका होती. त्या वेळी विली फक्त १२ वर्षांचा होता आणि मेरीचे वय ३४ वर्षे होते. दोघांत यादरम्यान प्रेमाला सुरुवात झाली आणि दोघांत शारीरिक संबंध प्रस्थापित झाले. हे सर्व वर्षभर सुरू राहिले. मेरीला याप्रकरणी १९९७ मध्ये अटक करण्यात आली, जेव्हा ती विलीच्या मुलाची आई बनणार होती.
student2
न्यायालयात केसच्या सुनावणीदरम्यान मेरीने हे कबूल केले की, तिने विलीशी शारीरिक संबंध प्रस्थापित केले. मेरीने तुरुंगातच बाळाला जन्म दिला आणि यामुळे तिला ६ महिन्यांच्या शिक्षेनंतर पॅरोलवर सोडण्यात आले. तथापि, न्यायालयाने मेरीला ही ताकीद दिली होती की, ती विलीसोबत कधीच दिसून येऊ नये. यासाठी तीही तयार झाली. परंतु तुरुंगातून सुटताच मेरी आणि विली पुन्हा एकमेकांच्या संपर्कात आले. सुटकेच्या काही महिन्यांनी पुन्हा दोघांना कारमध्ये आक्षेपार्ह अवस्थेत पकडण्यात आले. मेरी या वेळी पुन्हा प्रेग्नंट होती, परंतु तिला पॅरोलच्या नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी ७ वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली.
student3
मेरी आणि विली २००४मध्ये सुटकेनंतर काही तासांतच पुन्हा एक झाले. त्यांच्यात अनेक वर्षांपासून कोणताही संपर्क नव्हता तरीही. पुढच्याच वर्षी दोघांनी लग्न केले. विलीचे वय तेव्हा २० वर्षे झाले होते आणि मेरीचे वय ४२ वर्षे होते. आता दोघेही दोन मुलांचे आईवडील बनलेले होते. लग्नानंतर मेरीने आणखी दोन मुलांना जन्म दिला आणि कुटुंबासोबत वॉशिंग्टनमध्ये राहते.

Leave a Comment