पुन्हा एकदा आयटम साँग करण्यास सज्ज झाली मलायका

malaika-arora
अभिनेत्री मलायका अरोराने आतापर्यंत अनेक चित्रपटांमध्ये आयटम सॉग्स केल्याचे आपण पाहिलेच आहे. मलायका वयाच्या ४४ वर्षीही एखाद्या २१ वर्षीय तरुणीप्रमाणे स्वत: ला मेंटेन करुन असल्यामुळे वयाची ४० तिने ओलांडली आहे हे पाहणाऱ्याला खरे वाटणार नाही. आता ती पुन्हा एकदा आयटम साँग करण्यास सज्ज झाल्याचे पाहायला मिळत आहे.

कायम आपल्या वेशभूषेवरुन सोशल मीडियावर मलायका अरोरा ट्रोल होत असते. पण मलायका या साऱ्याकडे दुर्लक्ष करत स्वत:च्या फिटनेसकडे लक्ष देताना दिसते. तिला तिच्या याच फिटनेसमुळे पुन्हा एकदा आयटम साँग करण्याची संधी मिळाली असून ती लवकरच विशाल भारद्वाज यांच्या ‘पटाखा’ या चित्रपटामध्ये आयटम साँग करताना दिसून येणार आहे. मलायकाने आतापर्यंत ‘छैय्या, छैय्या’, ‘मुन्नी बदमान’ या सारखे प्रचंड गाजलेल्या आयटम साँगमध्ये आपले नृत्य कौशल दाखविले आहे.