तीन महिन्यांच्या प्रिव्ह्यू ऑफर सोबत लॉन्च होऊ शकते जिओ गिगाफायबर

JIO
मुंबई : १५ ऑगस्टपासून रिलायन्स जिओनं ब्रॉडबँड सेवा जिओ गिगाफायबरच्या नोंदणीला सुरुवात केली असून ही सेवा दिवाळीपर्यंत सुरु होण्याचा अंदाज आहे. सर्वाधिक नोंदणी ज्या शहरांमध्ये होईल तिकडून गिगाफायबर सेवेची सुरुवात होईल. ही सेवा देशातील ११०० शहरांमध्ये सुरु होणार असून गिगाफायबर लॉन्च होण्याच्या आधीच याच्या ऑफरची माहिती समोर येत आहे. तीन महिन्यांसाठी प्रिव्ह्यू ऑफर सोबत जिओ गिगाफायबर सेवा लॉन्च होऊ शकते. प्रिव्ह्यू ऑफरची माहिती कंपनीने आपल्या वेबसाईटवर दिली आहे.

कंपनीने याबाबत वेबसाईटवर दिलेल्या माहितीनुसार यूजरला गिगाफायबर प्रिव्ह्यू ऑफरमध्ये १०० एमबीपीएसचा स्पीड मिळणार आहे. यूजरला यामध्ये महिन्याभरासाठी १०० जीबी डेटा वापरता येईल. १०० जीबी डेटा वापरल्यानंतर यूजरला आणखी डेटाही फ्रीमध्ये मिळणार आहे. यामध्ये यूजरच्या अकाऊंटमध्ये ४० जीबी डेटा जोडला जाईल. याला डेटा टॉप-अपच्या माध्यमातून जोडले जाईल.

१०० जीबी डेटा संपल्यानंतर टॉप-अप करून ४० जीबी डेटा मिळेल. यानंतरही यूजरला एका महिन्यात २५ वेळा टॉप-अप करून डेटा मिळू शकतो, असा दावा एका रिपोर्टमध्ये करण्यात आला आहे. म्हणजेच महिन्याला एकूण १.१ टीबी डेटा फ्री मिळेल. कंपनीने प्रिव्ह्यू ऑफरबाबत अजून कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही.

४,५०० रुपये सुरुवातीला जिओ गिगाफायबरच्या सेवेसाठी भरावे लागणार आहेत. यूजरला हे पैसे परत मिळणार आहेत. जिओ गिगाफायबरसोबत जिओ गिगा टीव्ही, स्मार्ट होम अशा सुविधा फ्री देण्यात येणार आहेत. यूजरला महिन्याच्या वापरासाठी ४,५०० हजार रुपयांपेक्षा जास्त कोणतेही शुल्क द्यावे लागणार नाही. तीन महिन्यांची जिओची प्रिव्ह्यू ऑफर आहे. यूजरला जर ३ महिन्यांनंतर सेवा बंद करायची असेल तर त्याने भरलेले ४,५०० हजार रुपये परत मिळणार आहेत. पण सेट टॉप बॉक्स सुस्थितीत असेल तरच पूर्ण पैसे मिळतील, अशी अट जिओने घातली आहे.

Leave a Comment