अॅपलचे टाईम ट्रॅव्हल फिचर होणार हद्दपार

apple
सॅन फ्रान्सिस्को – इलेक्ट्रॉनिक क्षेत्रातील अग्रगण्य असलेल्या अॅपलच्या डिजीटल वॉचमधील ‘टाईम ट्रॅव्हल’ फिचर हद्दपार होणार असून त्याजागी नवीन घड्याळमध्ये ‘ऑपरेटिंग सिस्टम ५’ चा उपयोग करण्यात येणार असल्याचे अॅपलकडून सांगण्यात आले आहे. ऑपरेटिंग सिस्टम २ जुन्या घड्याळमध्ये असल्याने त्यात टाईम ट्रायव्हल फिचर कार्यरत होते.

वेळ मागे किंवा पुढे घेऊन कामाचे बुकमार्क देण्याकरिता ‘टाईम ट्रॅव्हल’ उपयोग करता येतो. त्याशिवाय स्क्रीनच्या डिस्प्लेवर तापमान, स्टॉक्सशिवाय इतर महत्त्वाच्या गोष्टी प्रदर्शित करता येतात. याबाबत अॅपलकडून मिळालेल्या माहितीनुसार, ऑपरेटिंग सिस्टीम ५च्या इन्स्टॉलेशन परीक्षणावेळी घड्याळामध्ये बिघाड झाला होता. नंतर त्यात सुधारणा करण्यात आली.

Leave a Comment