रात्री ६ ते सकाळी ८ दरम्यान ऑफिसचे कॉल आणि ईमेल यांना उत्तर देऊ नका – अॅमेझॉन इंडिया

amazon
बंगळूरू- या महिन्याच्या सुरुवातीला अॅमेझॉन इंडियाचे प्रमुख अमित अग्रवाल यांनी कर्मचाऱ्यांना एक ई-मेल पाठवुन वैयक्तिक जीवन आणि काम यांच्यात समन्वय ठेवा. तसेच रात्री 6 ते सकाळी 8 दरम्यान ऑफिसचे कॉल आणि ईमेल यांना उत्तर देऊ नका, असे सांगितले आहे. यासंदर्भातील माहिती ब्लूमबर्ग या वृत्तसंस्थेने दिली आहे.

अग्रवाल यांचा कामाच्या तणावामुळे कमी झोपणाऱ्या टेक्नॉलॉजी हब बंगळुरू मध्ये तसेच व्हॉट्सअप-सोशल मीडियावर लीक झालेला हा मेसेज चर्चेचा विषय बनला आहे. विशेष म्हणजे तणावपूर्ण कार्यसंस्कृतीसाठी अमेरिकी ई-कॉमर्स कंपनी अॅमेझॉन प्रसिद्ध आहे. या मेलवर प्रतिक्रिया देण्यास अॅमेझॉनच्या एका भारतीय प्रतिनिधीने नकार दिला आहे.

कर्मचाऱ्यांवर कंपन्यामधील वाढत्या स्पर्धेचा परिणाम होतो. कर्मचाऱ्यांना ९ ते ५ काम केल्यानंतरही घरी जावून कंपनीचे काम करावे लागते. मानसोपचारतज्ञ, स्लीप लॅब्रोटरीज आणि फर्टिलिटी क्लीनिक यांच्यामते कामाच्या तणावामुळे शरीर आणि मेंदूवर वाईट परिणाम होतो. यामुळे अनिद्रा, तणाव आणि आत्महत्येची प्रवृत्ती वाढते.

Leave a Comment