बियरच्या कचऱ्यापासून बनणार मंगळावर ग्रीनहाऊस!

aerogel
कोलोरॅडो- बियरच्या कचऱ्यापासून एक नवीन अति-उष्णतारोधक जेल अमेरिकेतील सीयू बोल्डरच्या संशोधकांनी विकसित केले असून या जेलचा उपयोग भविष्यात मंगळावर ग्रीनहाऊससारखे निवासस्थान निर्माण करण्यास होऊ शकतो. ‘एरोजेल’ असे या जेलचे नाव असून एखाद्या प्लास्टिकच्या कॉन्टॅक्ट लेन्सप्रमाणे हे जेल पारदर्शी दिसते.

भरपूर प्रमाणात या जेलमध्ये ऊर्जा असून या जेलचा वापर ऊर्जेची बचत करण्यासाठी पृथ्वीवर बांधण्यात येणाऱ्या इमारतींमध्येही करण्यात येईल. संशोधकांनी सांगितले की हे जेल उष्णता प्रतिरोधक असून आपण आपल्या हातावर याची एक पट्टी आग लावून ठेवल्यानंतरही आगीप्रमाणे प्रखर प्रकाश देऊ शकते.


याबाबत अधिक माहिती देताना अमेरिकेच्या कोलॅरॅडो विद्यापीठाचे प्राध्यापक इवान स्माल्याख यांनी सांगितले की, या जेलचे ‘पारदर्शकता हे वैशिष्ट्य असल्यामुळे आपण खिडक्या बनवण्यासाठी या जेलचा वापर करू शकतो. तसेच आंतराळातील इतर ग्रहावरही या जेलचा उपयोग केला जाऊ शकतो.

Leave a Comment