गुगलचे स्मार्ट डिजीटल डिसप्ले स्पीकर बाजारात येण्यासाठी सज्ज

google
सॅन फ्रान्सिस्को – गुगल लवकरच आपले स्मार्ट डिजीटल डिसप्ले स्पीकर बाजारात आणणार असून स्मार्ट स्पीकर तयार करणाऱ्या अॅमेझॉन आणि अलीबाबा यासारख्या नामांकित कंपन्यांवर याचा परिणाम होणार असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.

स्पीकरसहित ७ इंची टचस्कीन कृत्रिम बुद्धिमत्तेच्या आधारे काम करणाऱ्या गुगल स्मार्ट स्पीकरमध्ये देण्यात आली असून स्पीकरला देण्यात येणाऱ्या कमांड प्रदर्शित करण्यासाठी त्या स्क्रीनचा वापर होणार आहे. शिवाय यावर यूट्यूब व्हिडिओ, कॅलेंडर, नकाशा बघता येणार आहे. कामांचा बुकमार्क याच्या कॅलेंडरमध्ये नोंदवता येणार आहे. स्टँडर्ड गुगल होमचा वापर स्पीकरमध्ये करण्यात आला आहे. अतिशय किफायतशीर किंमतीमध्ये स्मार्ट स्पीकर ग्राहकांसाठी उपलब्ध केले जाणार आहेत. एकावेळी तीन मिलीयन यूनिट्स गुगल स्मार्ट स्पीकरच्या डिजीटल डिस्प्लेवर कार्यरत राहणार असल्याचे एका अहवालात सांगण्यात आले आहे.

गुगलने स्पीकर्स बाजारात अॅमेझॉनच्या इको, इको डॉट, अॅपलच्या होमपॉडशी स्पर्धा करण्यास आणल्याचे बोलले जात आहे. कारण ९० लाख स्मार्ट स्पीकर्स मागील जानेवारी ते मार्च काळात विकले गेले आहेत. यामध्ये सर्वात जास्त विक्री अॅमेझॉन स्मार्ट स्पिकर्सची आहे. पुढील काळात जेबीएल, लेनोवो, एलजी आणि सोनी स्मार्ट स्पीकर तयार करणार आहेत.

Leave a Comment