गुगल चीनमध्ये लॉन्च करणार नाही सर्च इंजिन – पिचई

sunder-pichai
कॅलिफोर्निया- जगप्रसिद्ध सर्च इंजिन गुगल कस्टमाइज्ड व्हर्जन चीनमधील कठोर निर्बंधानंतरही लॉन्च करणार असल्याच्या चर्चांना वेग आला असतानाच यासंदर्भातील वृत्त फेटाळले गुगलचे सीईओ सुंदर पिचई यांनी असून गुगल चीनमध्ये सर्च इंजिन सेवा लॉन्च करण्याच्या विचारात नसल्याचे पिचई यांनी स्पष्ट केले.

गुगलने चीनमधील नियमांचे पालन करण्यासाठी व सेंन्सार केलेले सर्च रिझल्ट दिसण्यासाठी सर्च इंजिनचे कस्टम व्हर्जन तयार केल्याचे वृत्त ‘सी’नेटने दिले होते. पिचई यांनी इंटरनेट धोरणांवर निर्बंध असलेल्या देशांमध्ये अधिक काम करणार असल्याचे सांगितले. ड्रॅगनफ्लाय नावाच्या गुप्त प्रकल्पाचा गुगलच्या १००० कर्मचाऱ्यांनी निषेध केला आहे. प्रतिबंधात्मक, राज्य-प्रायोजित सेन्सॉरशिपला सहाय्य करण्याच्या कंपनीच्या प्रयत्नांवर कर्मचाऱ्यांनी आक्षेप घेतला. विश्वसनीय सुत्रांच्या मते सर्च इंजिनचे कस्टमाइज्ड व्हर्जन लॉन्च करणार नसल्याचे पिचईं यांनी सांगितले असले तरी, प्रत्यक्षात गुगल सेन्सॉर्ड व्हर्जनवर काम करत आहे.

Leave a Comment