उत्तराखंडमधील हा आर्च ब्रिज बनला आहे पर्यटकांच्या आकर्षणाचे केंद्र

bridge
उत्तरकाशी – जवळपास २७८ मीटर सर्वात लांब आर्च ब्रीज उत्तराखंडमधील चिन्यालीसौडमध्ये बांधण्यात आल असून १६२ मीटर लांब मुख्य पूल आहे. पुनर्वसन विभागाने या सुंदर पुलाची निर्मिती केली आहे. उत्तर काशी सीमेमध्ये प्रवेश करणाऱ्या स्थानिक लोक आणि पर्यटकांचे हा पूल आकर्षणाचे केंद्र बनला आहे.

पुनर्वसन विभागाने भगीरथी नदीवर टीएचडीसीच्या ५२.७५ कोटी निधीतून या पुलाची निर्मिती केली आहे. देवीसौड पूल टिहरी बंधाऱ्याच्या निर्मितीनंतर भगीरथी नदीच्या पाण्याखाली जात असल्यामुळे चिन्यालीसौड तालुक्यापासून दिचली आणि गमरी पट्टीच्या गावांचा संपर्क तुटत होता. येथील स्थानिक नागरिक वारंवार याची तक्रार शासन आणि प्रशासनाकडे करत होते. त्यामुळे पुनर्वसन विभागाने या पुलाची निर्मिती केली. सध्या फेसबुक, व्हॉट्सअॅपवरही हा पूल आकर्षणाचे केंद्र बनला आहे. पुलाची लोडिंग टेस्ट अद्याप झालेली नाही. लायटिंग तसेच इतर सुविधेची व्यवस्था झाल्यानंतरच हा पूल नागरिकांसाठी उपलब्ध करण्यात येईल, असे डीएम डॉ. आशिष चौहान यांनी सांगितले.

Leave a Comment