आयकर विभागाकडून सचिनला १.३ लाख रूपयांच्या टॅक्समधून सुट

sachin-tendulkar
मुंबई – ट्रक्स प्रकरणामध्ये सचिन तेंडुलकरच्या बाजुने मुंबईच्या आयकर न्यायाधिकरण विभागाने (ITAT) निर्णय दिला असून सचिनच्या पुण्यातील फ्लॅटमधून मिळणारे उत्पन्न २०१२-१३ या आर्थिक वर्षांमध्ये शुन्य असल्याचे आयटीएटीने मान्य केल्यामुळे १.३ लाख रूपये आता सचिन तेंडुलरकराला भरावे लागणार नाहीत.

आयटीएटीने गेल्या आठवड्यात काढलेल्या ऑर्डरमध्ये २०१२-१३ या आर्थिक वर्षांमध्ये सचिन तेंडुलकरने ६१.२३ कोटींची कमाई केल्याचे म्हटले होते. तर पुण्यातील फ्लॅटला २०१२-१३ या आर्थिक वर्षात कोणीही भाडेकरू मिळाला नसल्यामुळे कोणतेही उत्पन्न त्यामधून मिळाले नसल्याचे सचिन तेंडुलकरने सांगितले.

याबाबत सचिन तेंडुलकरने असा दावा केला की, एका फ्लॅटमधून प्रतिमहिना १५ हजार रूपये भाडे घेतले. आयकर विभागाच्या १९६१ च्या सेक्शन २३(१)(सी) नुसार रिक्तता अलाऊन्स मिळावा. सचिनने असा दावा केला की, कोणतीही कमाई सैफायर पार्कमधील फ्लॅटमधून झाली नाही. जर कोणतेही उत्पन्न आर्थिक वर्षात मिळाले नसेल तर करदात्याला रिक्तता अलाउन्सनुसार सुट दिली जाते. याच आधारावर सचिन तेंडुलकरला टॅक्स प्रकरणात आयकर विभागाने सुट दिली आहे. पुण्यात सफायर आणि ट्रेजर पार्क या ठिकाणी ४५ वर्षीय सचिन तेंडुलकरचे दोन फ्लॅट आहेत.

Leave a Comment