२०२३मध्ये रस्त्यावर धावणार ‘अॅपल’ची कार

apple
हाँगकाँग – इलेक्ट्रॉनिक क्षेत्रात अग्रस्थानी असेलल्या अॅपलची कार बाजारात दाखल होणार नाही, अशी चर्चा सुरू होती. पण २०२३ ते २०२५ च्या दरम्यान आयफोन निर्मित ही कार बाजार दाखल करण्याची शक्यता असून हा दावा हाँगकाँगमधील टीएफ इंटरनॅशनल सिक्योरिटीजच्या विश्लेषकांनी केला आहे.

अॅपल या कारच्या माध्यमातून जवळपास २ कोटी अमेरीकन डॉलरचा व्यवसाय करेल. आंतरराष्ट्रीय अॅटोमोबाईल मार्केटमध्ये अॅपलची कार क्रांतीकारी बदल घडवेल असा विश्वास मॅक रुमॉर्स यांनी व्यक्त केला आहे. या कारच्या वैशिष्ठ्यांबाबत आणि अनावरणाबाबत कोणतीही माहिती अद्याप देण्यात आली नाही.

Leave a Comment