वायफायचा वापर करून घेता येणार शस्त्रास्त्रे आणि स्फोटकांचा शोध

WIFI
वॉशिंग्टन – सार्वजनिक ठिकाणी सुरक्षेच्यादृष्टीने शस्त्रास्त्रे आणि स्फोटकांचा शोध वायफायचा वापर करून घेता येणार असून खेळाची मैदाने, प्रार्थनास्थळे, मंदिरे, शाळा या ठिकाणी वायफायचा वापर करता येणे शक्य असल्याचे एका संशोधनातून समोर आले आहे. हा शोध यिंगिंग चेन या संशोधकाने लावला आहे.

सध्या बॉम्बशोधकाची अस्तित्वात असलेली यंत्रणा खूपच महागडी असून संशयित वस्तूचा शोध वायफायच्या माध्यमातून घेणे अत्यंत सोपे असल्याचे संशोधकाचे मत आहे. हे गर्दीच्या ठिकाणी सुरक्षेच्यादृष्टीने हे उपकरण खूप प्रभावी ठरू शकते, त्यामुळे याची गरज असल्याचे संशोधक यिंगीग चेन यांनी सांगितले.

संशोधनातून हे समोर आले आहे की, प्रवासी बॅग, धातूच्या वस्तू, शस्त्रे यांचा सार्वजनिक ठिकाणी वायफाय सिग्नलच्या मदतीने लगेच शोध घेता येतो, तसेच वायफाय सिग्नलचा वापर लॅपटॉप, स्पोटासाठी वारण्यात येणारी बॅटरी, अॅल्युमिनीअमचे डबे यांचा शोध घेण्यासाठी करता येऊ शकत असल्याचे चेन यांचे मत आहे. केवळ २-३ सिग्नल पुरविणाऱ्या उपकरणांची वायफायच्या माध्यमातून घातक वस्तुंचा शोध घेण्यासाठी आवश्यकता आहे.

Leave a Comment