नवी दिल्ली – ४जी हे अत्याधुनिक तंत्रज्ञान घेऊन रिलायन्स कंपनीने प्रतिस्पर्धी कंपन्यांना धडकी भरविली होती. रिलायन्सने त्यानंतर हायस्पीड ब्रॉडबँडची घोषणा केली होती. घरगुती हायस्पीड ब्रॉडबँडसाठी जिओने ऑनलाईन नोंदणी सुरू केली आहे.
जिओ गिगा फायबरच्या ऑनलाईन नोंदणीला सुरुवात
गेल्या महिन्यात गीगा फायबर लॉन्च करण्यात आले आहे. याबाबत कंपनीने केलेल्या दाव्यानुसार १ जीबीपीएसचा इंटरनेट स्पीड ग्राहकांना मिळणार असून ग्राहकांची ज्या भागातून अधिक नोंदणी असेल तेथे कंपनी सर्वप्रथम ब्राँडबँडची सेवा देण्यात येणार आहे.
गीगा फायबरची १ हजार १०० शहरात सुरुवात केली जाणार असल्याचे रिलायन्सचे चेअरमन मुकेश अंबानी यांनी जाहीर केले होते. पण कधी या सेवेची सुरुवात होणार आहे, याची तारीख अद्याप जाहीर करण्यात आली नाही. जिओ ब्रॉडबँड सेवेसाठी ग्राहकांना ऑनलाईन नोंदणी करावी लागणार आहे.