ट्विटर इंडियाचे देशभरातील काही निवडक भाषांमध्ये ‘स्वातंत्र्य दिना’चे खास हॅशटॅग

twitter
ट्विटर इंडियाने ७२व्या स्वांतत्र दिनानिमित्त खास हॅशटॅग तयार केला आहे. या खास हॅशटॅगसंदर्भातील माहिती ट्विटर इंडियाच्या अधिकृत अकाऊंटवरून देण्यात आली आहे. ‘स्वातंत्र्य दिना’चे वेगळे हॅशटॅग देशभरातील काही निवडक भाषांमध्ये तयार करण्यात आले आहेत. मराठी भाषेतील हॅशटॅगचाही यात समावेश आहे.


देशवासीय आजच्या दिवशी ट्विटरवर मोठ्या प्रमाणात #IndependenceDay, #स्वातंत्र्यदिन यांसारखे हॅशटॅग वापरून शुभेच्छा देतात. त्यामुळे मराठी, इंग्रजीसह, हिंदी, गुजराती, तमिळ अशा अनेक भाषांत ट्विटरने हॅशटॅग तयार केले आहे. हे हॅशटॅग ट्विटरवर टाईप केल्यास त्यापुढे लाल किल्ल्याचा इमोजीदेखील दिसणार आहे. दिल्लीतील ऐतिहासिक लाल किल्ल्यावर दरवर्षी ध्वजारोहण केले जाते. त्यामुळे लाल किल्ल्याला या इमोजीमध्ये विशेष स्थान देण्यात आले आहे.

Leave a Comment