गिनीज बुकने घेतली सोन्याच्या तिरंग्याची दखल

flag
नवी दिल्ली – एका देशप्रेमी तरुणाने जगातील सगळ्यात लहान आकाराचा सोन्याचा तिरंगा बनविला असून या राष्ट्रध्वजाची जगातील सर्वात लहान राष्ट्रध्वज म्हणून गिनीज बुकात नोंद झाली आहे.

कोइंबतूरमधील एका तरुण सोनाराने नागरिकांमध्ये देश प्रेमाची भावना व्यक्त करण्यासाठी हा सोन्याचा झेंडा तयार केला असून त्याने अवघ्या ४ मिली ग्रॅम सोन्यापासून हा झेंडा तयार केला आहे.

एका काडेपेटीच्या काडीवर ही कलाकृती तयार करण्यात आली असून यामध्ये राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि स्वातंत्र्य सैनिक स्वातंत्र्यदिनाच्या संचलनात चालत असल्याचे दाखवण्यात आले आहे. या झेंड्याची जगातला सगळ्यांत लहान झेंडा म्हणून गिनीज बुकात नोंद करण्यात आली आहे.

Leave a Comment