पसंतीच्या जोडीदारासाठी ४६ वर्षीय महिलेची अशी ही जाहिरातबाजी

hoarding
बँकॉक – सर्वसाधारणपणे कोणाचे लग्न जुळवायचे असेल तर आपण सर्वात आधी ओळखीच्या व्यक्तींकडे चौकशी करतो. त्यानंतर वधुवर सूचक मंडळ आणि ऑनलाईन मॅट्रिमोनियल संकेतस्थळाचा देखील आधार घेतो. पण याबाबतीत थायलंडच्या एका महिलेने सर्व सीमा पार करत आपल्या पसंतीच्या जोडीदाराचा शोध घेण्यासाठी शहरात जाहिरातबाजी केली आहे.

आता तुम्ही म्हणाल यात काय नवीन आहे. तर आम्ही तुम्हाला सांगतो या महिलेने कशी जाहिरात केली याची माहिती. आपल्या पसंतीच्या जोडीदाराचा शोध घेण्यासाठी येथील ४६ वर्षीय महिलेने आपले टॉपलेस होर्डिंग लावले आहे. सध्या तिचे हे होर्डिंग आणि त्यावर लिहिलेल्या गोष्टी वाचून येथील नागरिक हैराण आहेत. या महिलेने लग्नासाठी केलेला तिचा स्टंट सोशल मीडियावर सध्या व्हायरल होत आहे. दोन वर्षे जुनी ही घटना असली तरीही सोशल मीडियावर पुन्हा व्हायरल झाली आहे.

थायलंडची राजधानी बँकॉकमध्ये हे बॅनर लागले असून येथे राहणाऱ्या एका मॉडेलने लग्नाचा निर्णय घेतला. तसेच आपल्या जोडीदाराचा शोध घेण्यासाठी तिने स्वतःचीच जाहिरात केली. तिचे नाव पुई पाथुमथोंग असे असून बँकॉकमध्ये पुईने आपले टॉपलेस होर्डिंग लावले. सोबतच आपला मोबाईल नंबर आणि विचित्र तपशील सुद्धा लिहिला. तिने होर्डिंगवर लिहिल्याप्रमाणे, ती ४६ वर्षांची असून पतीच्या शोधात आहे. त्याचबरोबर आपण व्हर्जिन असल्याचा दावाही तिने केला. आयुष्यातील एकटेपणा दूर करण्यासाठी जोडीदाराची गरज असल्याचेही तिने लिहिले. हा पोस्टर त्यावेळी सुद्धा सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. त्याच व्हायरल पोस्टवरून पोलिसांनी कारवाई केली.

Leave a Comment