२३ ऑगस्टला लाँच होणार देशातील पहिली इलेक्ट्रीक हायब्रिड स्कूटर

TVS
येत्या २३ ऑगस्टला देशातील पहिली इलेक्ट्रीक हायब्रिड स्कूटर TVS iQube लाँच होत असून ही स्कूटर लाँच करण्याची तयारी पूर्ण कंपनीने केली आहे. ही स्कूटर सर्वप्रथम २०१०च्या अॅटो एक्स्पोमध्ये सादर करण्यात आली होती. या स्कूटरचे वैशिष्ट्य म्हणजे ही पेट्रोलबरोबरच बॅटरीवरही चालेल. अशा प्रकारचे फिचर असणारी ही पहिली स्कूटर आहे. पण या स्कूटरबाबत अद्याप कोणतीही माहिती मिळालेली नाही.

या स्कुटरमध्ये ११०सीसीचे सिंगल सिलिंडर पेट्रोल इंजिन देण्यात आले असून त्याचबरोबर यात इलेक्ट्रीक मोटरही आहे. ती १५०Wh आणि ५००Wh च्या बॅटरीसह येते. इकॉनॉमी आणि पॉवर रायडिंग मोड्समध्ये इलेक्ट्रीक स्कूटर कंट्रोल करते. म्हणजे ताशी २०किमीच्या वेगाने ही स्कूटर धावेल तेव्हा तिला इलेक्ट्रीक मोटरकडून पॉवर मिळेल. तर त्याच्यापुढे वेग जाताच त्याला पेट्रोल इंजिनकडून पॉवर मिळायला सुरुवात होईल. ही स्कुटर पेट्रोलवर ७० kmpl चे मायलेज देईल, असा दावा कंपनीकडून करण्यात आला आहे.

८ वर्षांपूर्वी ही स्कूटर शोकेस करण्यात आली होती. त्यामुळे तिचे डिझाइन तसेच असेल का याबाबत सांगता येत नाही. कंपनीने तेव्हा कॉन्सेप्ट मॉडेल सादर केले होते. पण ही टीव्हीएसची सर्वात स्टायलीश लूकची स्कूटर असणार हे नक्की. तरुणाईला समोर ठेवून ही स्कूटर डिझाइन करण्यात आली आहे.

Leave a Comment